Home क्राईम न्यूज पिंपळगाव उंडा येथे महीलेची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपळगाव उंडा येथे महीलेची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपळगाव उंडा येथे महीलेची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील महीला गीतांजली आश्रू (बाळू) गव्हाणे, वय अंदाजे 45 वर्षे या महीलेने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महतेचे कारण अद्याप समजु शकले नसले तरी आर्थिक विवंचनेतुन महीलेने आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकान कडुन सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळगाव उंडा येथील महीला सौ. गीतांजली आश्रू (बाळू) गव्हाणे या आपल्या कुटुंबासमवेत पिंपळगाव उंडा येथे रहात होत्या. त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आसुन शेतात पतीसोबत त्या शेती करत होत्या. मयत गीतांजली गव्हाणे यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

काल मंगळवार दि 22 एप्रिल रोजी दुपारी सौ. गीतांजली गव्हाणे यांनी शेजारच्या गावात सासरी रहात असलेल्या आपल्या मुलीला व जावई यांना फोन करून मी आत्महत्या करणार आहे आसे सांगितले होते. यानंतर पिंपळगाव सोनेगाव रस्त्याच्या डाव्या बाजुला काही अंतरावरील एका झाडाला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सौ. गीतांजली गव्हाणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर त्यांची विवाहित मुलगी व जावई पिंपळगाव उंडा या ठिकाणी आले व जावई व मुलीने आईचा शोध घेतला असता त्यांना शेतात जाऊन आत्महत्या केली असल्याचे समजले.

मयत गीतांजली गव्हाणे यांना तातडीने जामखेड येथील खाजगी दवाखान्यात घेऊन गेले त्यावेळी डॉक्टरांनी त्या मयत झाल्या असल्याचे सांगितले. यानंतर खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आर के सय्यद व गणेश बडे यांनी पंचनामा केला. त्यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयत गीतांजली गव्हाणे यांच्या मागे पती एक अकरा वर्षाचा मुलगा, दोन मुली (एक मुलगी विवाहित) असा परीवार आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी आर के सय्यद हे करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!