रोखठोक जामखेड….
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. तसेच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही आता वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील ९२ वर्षीय बबन एकनाथ क्षीरसागर या वृध्दाने मोठ्या धैर्याने कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाने काहीही होत नाही, उपचाराने तो बरा होतो, असा धीर देणारा संदेशही त्यांनी इतरांना दिला आहे.
बबन शिरसागर यांना कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्याने त्यांचा मुलगा बापु क्षिरसागर यांनी त्यांची कोरोना चाचणी केली. यात त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. आँक्सिजन लेवल देखील ८५ एवढी खाली आली होती. मात्र मोठय़ा धीराने त्यांच्या मुलाने न डगमडता आपल्या वडीलांना जामखेड शहरातील मुंढे हॉस्पिटल येथील कोविड सेंटर मध्ये दाखल केले. डॉ अविनाश मुंढे यांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार केले. विविध वैद्यकीय चाचण्यासह केलेल्या औषध उपचाराला क्षिरसागर यांची साथही मिळाली. त्यामुळे प्रतिकार शक्ती अन् जिद्दीच्या बळावर त्यांनी कोरोनावर मात केली. तब्बल अकरा दिवसांनी ते कोरोना मुक्त होऊन आपल्या घरी सुखरुप पोहचले. बबन क्षिरसागर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी कोरोनावर मात केल्यामुळे मुंढे हॉस्पिटल चे संचालक डॉ एकनाथ मुंढे व डॉ.आविनाश मुंढे यांनी रुग्णाचा सत्कार केला तसेच आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले.






