राज्यस्तरीय इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत नवीन मराठी शाळेतील इयत्ता ७ वी व ८ वीच्या विद्यार्थांचे देदीप्यमान यश

जामखेड प्रतिनिधी

राज्यस्तरीय इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड आयोजित परीक्षेत नवीन मराठी शाळेतील प्राथमिक विभागाप्रमाणेच माध्यामिक विभागातील विद्यार्थ्यांनी देखील घवघवीत असे संपादन केले आहे.

यामध्ये इयत्ता सातवी मधील चि. अथर्व राणी अजिनाथ शिरसाठ या विद्यार्थ्याने विज्ञान या विषयात राज्याच्या गुणवत्ता यादीत ५ वा क्रमांक पटकावला त्याला इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परिषदेतर्फे रुपये १००० शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच इयत्ता आठवी मधील चि. वेदांत पल्लवी वैभव कुलकर्णी या विद्यार्थ्याने विज्ञान या विषयात राज्याच्या गुणवत्ता यादीत २२ वा क्रमांक पटकावला त्याला इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परिषदेतर्फे एक्सलन्स अवॉर्डने गौरविण्यात येणार आहे, इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी कु. समृद्धी दिप्ती विपुल कुलकर्णी या विद्यार्थिनीने गणित विषयात राज्यात ७ वा क्रमांक मिळवला तिला इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परिषदेतर्फे रुपये ७०० शिष्यवृत्ती मिळणार आहे.

वरील विद्यार्थ्यांना श्रीमती. जायभाये मॅडम, हजारे सर व सोनटक्के सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष सर्व संचालक व शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here