जिल्हा परिषद शाळेला पुरेसे शिक्षक मिळेणात, विद्यार्थ्यांची शाळा भरली जामखेड पंचायत समिती कार्यालयात
जामखेड प्रतिनिधी
मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षकांची संख्या कमी आहे तसेच शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याच्या कारणाने आज जामखेड येथील पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जामखेडचे वंचित बहुजन आघाडीचे राज्यप्रवक्ते ॲड.डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात आली होती. अखेर गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासना नंतर विद्यार्थ्यांन समवेत सुरू आसलेले वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन मागे घेण्यात आले.
जामखेड तालुक्यातील मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग भरवले जातात, एकूण पाच शिक्षकांची नेमणूक आहे, मात्र सध्या याठिकाणी पहिली ते आठवीच्या वर्गासाठी फक्त तीनच शिक्षक उपलब्ध आहेत. यामुळे मुलांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम होऊ लागलेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी निवारा बालगृहामधील अनाथ निराधार व वंचित घटकातील मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र या ठिकाणी पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याने मुलांची प्रगती घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या सात दिवसांपूर्वी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी करून देखील शिक्षण विभागाकडून याची दखल घेण्यात आली नाही. याच अनुषंगाने जामखेड येथील वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दि २४ फेब्रुवारी रोजी सकाळी जामखेड येथील पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शाळा भरवण्यात आली. तसेच जोपर्यंत आम्हाला शाळेला शिक्षक उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही. तसेच दररोज या ठिकाणी शाळा भरवण्यात येईल असा निर्धार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला होता.
यानंतर बदली प्रक्रियेमध्ये कींवा शिक्षक पदस्थापनेमध्ये प्राथमिक शिक्षकांचे पद मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रथम भरण्यात येईल आसे लेखी आश्वासन जामखेडचे गट शिक्षणाधिकारी विजय शेवाळे यांनी दिल्यानंतर सदरचे विद्यार्थ्यांन समवेत सुरु असलेले वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलना दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राज्यप्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव, उमाताई जाधव, बापू ओहोळ, सचिन भिंगारदिवे, राजू शिंदे, ऋषी गायकवाड, वैजीनाथ केसकर, संतोष चव्हाण, तुकाराम शिंदे, विशाल पवार, उर्मिला कवडे, भिमराव सुरवसे, सर्जेराव गंगावणे, मच्छिंद्र जाधव, कृष्णा जाधव, रजनी बागवान, संगीता केसकर, राहुल पावर, सरपंच भिमराव कापसे व निवारा बालगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.