जामखेड न्यायालयाकडून विवाहितेस तीस हजार रुपये अंतरिम पोटगी मंजूर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड चे न्यायाधीश व्ही व्ही जोशी साहेब यांनी दोन्ही पक्षांची परिस्थिती राहणी मान व सामनेवाले यांचे उत्पन्न व अर्जदाराची गरज लक्षात घेऊन विवाहितेस रुपये 30 हजार रुपयांची अंतरिम पोटगी मंजूर केली. महीला अर्जदारा तर्फे एडवोकेट बिपिन वारे यांनी काम पाहिले तर त्यांच्या सोबत ॲड. सागर मोरे व ॲड. अरबाज सय्यद यांनी सहाय्यक वकील म्हणून काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड न्यायालय येथे एका विवाहित महिलेने फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 125 एक नुसार पोटगीसाठी अर्ज दाखल केला होता. अर्जदारा तर्फे युक्तिवाद एडवोकेट बिपिन वारे यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद करताना सांगितले की विवाहितेचा व्यवस्थित संभाळ करण्याची जबाबदारी पासून सामनेवाले स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही तसेच सामने वाला यांचा उत्पन्नाचा स्रोत विचारात घेणे गरजेचे वाटते त्याप्रसंगी त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा रजनीश विरुद्ध नेहा या निर्णयाचा दाखला दिला.
शेवटी माननीय न्यायाधीश व्ही व्ही जोशी साहेब यांनी दोन्ही पक्षांची परिस्थिती राहणी मान व सामनेवाले यांचे उत्पन्न व अर्जदाराची गरज लक्षात घेऊन विवाहितेस रुपये 30000 अंतरिम पोटगी मंजूर केली याप्रसंगी विवाहिता तर्फे एडवोकेट बिपिन वारे यांचा युक्तिवाद प्रभावी ठरला त्यांना याप्रसंगी एडवोकेट सागर मोरे व ॲडव्होकेट अरबाज सय्यद यांनी सहाय्यक वकील म्हणून काम पाहिले
चौकट
सदरचा आदेश करत असताना माननीय न्यायाधीश व्ही व्ही जोशी साहेबांनी सद्यस्थिती च्या तरुण विवाहित जोडप्यांच्या कुटुंब व्यवस्थेवर चिंता व्यक्त करून तरुण विवाहित जोडप्यांनी सामंजस्याने एकमेकांसोबत कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here