मोहरी येथील पॉवर सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पावणेसात लाख रुपयांची कॉपर केबल चोरीस
जामखेड प्रतिनिधी
मोहरी परीसरात आसलेल्या पॉवर सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी पावणेसात लाख रुपयांची सत्तावीस हजार मीटर लांबीची कॉपर केबल चोरुन नेली आहे. या प्रकरणी पाच ते सहा अज्ञात चोरटय़ांन विरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक अशी की जामखेड तालुक्यातील खर्डा ते जातेगाव रोडवरील मोहरी परीसरात गेल्या आनेक वर्षापासून पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा उर्जा निर्मितीचा प्लांट आहे. या ठिकाणी दि १७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात चोरटे आले व त्यांनी या ठीकाण ओ २ पॉवर डिसी केबल, २७ हजार मीटर तांब्याची तार असलेले केबलचे २७ ड्रम रोल आशी एकुण ६ लाख ७५ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चारचाकी वहाणाच्या सहाय्याने चोरुन नेली.
या प्रकरणी दत्ता रामा बारगजे वय (३२) वर्ष, धंदा सिक्युरिटी गार्ड, रा. नागोबाचीवाडी यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दि १८ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात पाच ते सहा चोरट्यांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी भेट दिली असून सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड करत आहेत.













