छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जामखेड येथे १९ फेब्रुवारीला कुस्ती स्पर्धेचे आयोजन
शंभुराजे कुस्ती संकुल जामखेड व रोहित पवार मित्र मंडळाच्या वतीने केले आयोजन
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शंभुराजे कुस्ती संकुल जामखेड व रोहित पवार मित्र मंडळ जामखेड यांच्या वतीने दि बुधवार दि १९ फेब्रवारी रोजी जामखेड येथे भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दिल्ली येथील पै.आशिष हुड्डा विरूद्ध पुण्याचा पै. दादा शेळके असा चित्त थरारक कुस्तीचा सामना होणार आहे. या कुस्ती सामन्यांसाठी शिवप्रेमी व कुस्ती शौकीनांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शंभुराजे कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मंगेशदादा आजबे यांनी केले.
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व शंभुराजे कुस्ती संकु व रोहित पवार मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले असुन यावेळी दिल्ली येथील पै.आशिष हुड्डा विरूद्ध पुण्याचा पै. दादा शेळके कुस्तीचा सामना होणार आहे. याबरोबरच पै. सागर मोहळकर विरुद पै. बंटी शेळके , पै. संदीप लटके विरुद्ध पै.भैय्या शेळके पै. पृथ्वीराज वणवे विरुद्ध पै. साहिल पाटील अशा अनेक दिग्गज पैलवानांच्या कुस्त्या जामखेडकरांना पाहावयास मिळणार आहेत.
भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शंभुराजे कुस्ती संकुलाचे पै. प्रतीक मुळे विरुद पै.विशाल शिंदे, पै संजय तनपुरे विरुद्ध पै शुभम मगर,पै विकास तावरे विरुद्ध आखिब शेख,पै सौरभ गाडे विरुद्ध पै पप्पू देशमुख,पै उमेश शिंदे विरुद्ध पै गणेश काळे यांच्यासह जवळपास १०० च्या वर पैलवानाच्या कुस्त्या होणार आहे. या कार्यक्रमास खासदार निलेश ;लंके खासदार ओम राजे निंबाळकर आ. रोहित पवार आ सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दि. १९ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक मंगेश कन्स्ट्रक्शन ऑफीस ते नागेश विद्यालय मिरवणुक निघेल. दुपारी ३.०० वाजता श्री नागेश विद्यालय जामखेड या स्पर्धा पार पडणार असून स्पर्धेच्या सहभागासाठी पै.बालाजी जरे ८८३०७९३५००, पै. श्रीधर मुळे ७०२०६८१९१०,यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.