श्री नागेश विद्यालय व महावितरण मधील २२ फुटाचा रस्ता खुला करावा; नागरिकांची मागणी
जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांना निवेदन
जामखेड प्रतिनिधी
शहरातील तपनेश्वर गल्ली येथील संतोषी माता मंदिर परिसरातील श्री नागेश विद्यालय जामखेड व महावितरण मधील रस्ता बंद करण्यात आला आहे. हा रस्ता खुला करावा यासाठी येथील नागरिकांनी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांना निवेदन दिले आहे.

यावेळी नगरसेवक मोहन पवार, युवा नेते बजरंग डूचे, ताहेर खान, अनिस बागवान, बाळासाहेब डोकडे, शंकर राऊत, विजय कुलकर्णी, सचिन देशमुख, बापूसाहेब कुलकर्णी, धनराज पवार, जमीर बागवान, मनोज इंगळे, मंगेश घोडेस्वार, नितीन यादव, अस्लम भाई शेख, आसिफ शेख, शाहरुख बागवान, अशपाक बागवान, आरिफ बागवान,जाकीर सय्यद, ईश्वर गुड, बबलू बागवान
आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील व महावितरण चे राठोड हे उपस्थित होते. याबाबत माहिती की, जामखेड शहरातील श्री नागेश विद्यालय व महावितरण मध्ये सुमारे २२फुटांचा पायवाट रस्ता आहे. या रस्त्याने चांगल्या प्रकारे वाहतूक होत असून महावितरण ने सदर रस्ता बंद करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार रस्त्याचे खोदकाम चालू आहे या ठिकाणी महावितरण ने सांगितल्या प्रमाणे या ठिकाणी सोलार प्लांट (सौरऊर्जा प्रकल्प)असल्याचे ठेकेदार सांगत आहेत. सदर रस्ता बंद झाल्यास परिसरातील नागरिकांना वागणुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे, तसेच यापैकी परिसरात मोठा रस्ता नाही.
याच रस्त्याने जिल्हा परिषद शाळेतील लहान मुले, ल.ना.होशिंग विद्यालय, श्री नागेश विद्यालय व जामखेड महाविद्यालयातील मुले- मुली याच रस्त्याने ये – जा करत असतात. सरकारी व विविध दवाखान्यात जाणारे रुग्ण व बीड रोडला जाण्या-येण्यासाठी जवळचा मार्ग आहे. याच रस्त्याने रुग्णवाहिका, अग्निशमन गाडी येऊ शकते. सदर रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे, हा पूर्वत रस्ता खुला करून देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन नागरिकांनी दिले आहे. सदर रस्ता पूर्ववत खुला न झाल्यास परिसरातील नागरिकांनी तीव्र पद्धतीचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here