महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली मुख्यमंत्री व ग्रृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मागणी, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा जामखेड मध्ये निषेध
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, महीलांवरील व लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. त्यातच मंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. आशा घटना वारंवार घडत असल्याने मुख्यमंत्री व ग्रृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आज निवेदन देता वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मंबई येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेचा आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज 14 ऑक्टोबर रोजी सकाळी तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.
यावेळी पदाधिकारी यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी.
महाराष्ट्र आता सुरक्षित राहीला नाही महीला व मुलींवर अत्याचार वाढले आहेत. हे सरकार झोपलेले नसुन झोपेचे सोंग घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली ही महाराष्ट्रासाठी दुःखद घटना आहे. बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा व आरोपी दोन महीने रेकी करत होते तरी देखील त्यांची हत्या झाली. ग्रृहमंत्र्यांची यंत्रणा कुचकामी ठरली आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व ग्रृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आशी मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला.
निवेदन देता वेळी रमेश (दादा) आजबे, शहाजी (काका) राळेभात, विकास (तात्या) राळेभात, निखिल (आप्पा) घायतडक, प्रशांत (काका) राळेभात, कुंडल राळेभात, प्रकाश काळे, उमर कुरेशी, बजरंग डुचे, नरेंद्र जाधव, राजेंद्र गोरे, हरिभाऊ आजबे, बाबासाहेब मगर, अनिल बाबर, वसीम सय्यद, संजय डोके, भीमराव पाटील, राम शिरगिरे, केशव डोके व नासीर सय्यद सह जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.