कर्जत येथील शिक्षकाच्या खुन प्रकरणी आरोपीस 24 तासात अटक, मोटारसायकल आडवुन दांडक्याने मारुन केला होता खुन
कर्जत प्रतिनिधी
पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत असा संशय घेऊन बदनामी करत आहे, म्हणून याचा राग येवून कुटुंबासमवेत मोटारसायकलवर चाललेल्या शिक्षकास रस्त्यावर अडवून लाकडी दांडक्याने जबर मारहाण करत खून केला होता. यानंतर तातडीने आरोपीला मिरजगाव पोलिसांनी 24 तासात जेर बंद केले.
याबाबत घडलेली घटना अशी की कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे अशोक प्रभाकर आजबे, वय ते 30 वर्ष राहणार शिराळ, तालुका आष्टी. (हल्ली राहणार कर्जत शहर). हे दिनांक 12 रोजी रात्री साडेआठ वाजता रातंजन तालुका कर्जत येथील मामाच्या गावावरून काल्याचे कीर्तन संपल्यानंतर सर्व गावाला जेवण देऊन पत्नी व मुलासह मिरजगाव-कर्जत रस्त्यावरून कर्जतच्या दिशेने येत असताना चिंचोली काळदात गावाजवळील लवणात अगोदरच दबा धरून बसलेल्या योगेश विजय आजबे, वय 27 वर्ष, राहणार शिराळ, तालुका आष्टी, याने लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून मोटरसायकल वरून जात असणाऱ्या मयत शिक्षक अशोक आजबे यांना गाडीवरून खाली पाडले. यानंतर पुन्हा लाकडी दांडक्याने अशोक यांच्यावर हल्ला केला आणि पळून गेला. यानंतर जखमी झालेल्या अशोक यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे अधिवेशन विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व मिरजगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील सहाय्यक फौजदार सुनील माळशखरे, बबन मखरे, उमाकांत गावडे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रमोद जाधव, पूरकान शेख, विकास चंदन, गणेश ठोंबरे, सुनील खैरे, राहुल गुंड, गोकुळदास पळसे, राजू गाडे, गंगाधर आगरी व चालक अशोक रक्ताट यांनी अवघ्या 24 तासांमध्ये आरोपी योगेश विजय आजबे यास सापळा रचून पकडले.

पकडल्यानंतर योगेश विजय आजबे याने मयत अशोक आजबे हा सतत त्याच्या पत्नी सोबत माझे प्रेम संबंध आहे असा संशय घेत असल्यामुळे माझी बदनामी होत होती म्हणून ती सहन न झाल्याने मी लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून त्याला जीवे ठार मारले आहे अशी कबुल दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here