वासराच्या मदतीला मनसेचे अनिल पाटील, नगरपरिषदेच्या दुर्लक्षावर कठोर शब्दांत टीका
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील मनसेचे शहर उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी पुन्हा एकदा समाजसेवेचे दर्शन घडवले. 12 ऑगस्ट रोजी एका जखमी वासराच्या मदतीला धावून आल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कैतुक होत आहे.
दोन दिवसांपासून त्यांच्या मित्र शुभम राऊत यांच्या घराजवळ एक गाईचे वासरू गंभीर त्रासाने ग्रस्त होते. याबाबत नगरपरिषदेला वारंवार कळवूनही त्याची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. ही माहिती मिळाल्यानंतर अनिल पाटील यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय (काका) कोठारी यांच्याशी संपर्क साधला. कोठारी यांनी लगेचच पशुवैद्यकीय अधिकारी संजय राठोड यांना फोन करून घटनास्थळी पाठवले. पाच मिनिटांत डॉक्टरांनी तिथे येऊन वासरावर उपचार सुरू केले, आणि सध्या त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
नगरपरिषदेवर टीका
जामखेड शहरात भटके कुत्रे आणि जनावरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नगरपरिषदेकडे असूनही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी अनिल पाटील यांनी नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहरातील नागरिकांची आरोग्य व सुरक्षा यांची काळजी घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य असून, त्यात झालेल्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here