एस टी बस वेळेवर येत नसल्याने जवळका येथील विद्यार्थ्यांचा जामखेड एस. टी बस डेपोत ठिय्या.
जामखेड प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या नंतर जामखेड तालुक्यातील जवळका येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीची एस टी बस वेळेवर येत नसल्याने आज मंगळवार दि 13 रोजी जवळका येथील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी जामखेड येथील एसटी डेपो गाठत ठिय्या आंदोलन केले. तसेच याबाबत जवळका येथील विद्यार्थ्यांच्या एस.टी बसचा प्रश्न सुटला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जवळका येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी दिला आहे.
शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नुकतेच महिलांसाठी 50% एसटी बसचे सवलत दिली आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी एसटी बसचा प्रश्न अजून सुटलेला नाही. याच अनुषंगाने जवळका येथील 90 ते 100 विद्यार्थी नान्नज येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शाळेत शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना जवळका येथून आठ किलोमीटर अंतरावरून नान्नज येथे जाण्यासाठी वेळेवर बसत येत नाही. शनिवारी तर बसच येत येत नाही असे देखील विद्यार्थींनी सांगितले.
त्यामुळे एसटी बस वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना जवळका बस स्टॉप वरती दोन ते तीन तास बसची वाट पाहत बसावे लागते. कधी कधी एसटी बसच येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा देखील बुडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच बरोबर शाळा सुटल्यानंतर देखील नान्नज येथुन जवळका येथे जाण्यासाठी बस उशिरा जात असल्याने विद्यार्थ्यांना जवळका येथून पुढे आपल्या घरी वाडीवस्तीवर जाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायी अंधारातच जावे लागते.
गेल्या अनेक महिन्यांपासून या बसचा प्रॉब्लेम असल्याने आज मंगळवार दि 13 ऑगस्ट रोजी संतप्त झालेल्या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ग्रामस्थान समवेत जामखेड येथील बस डेपो मध्ये बस वेळेवर येत नसल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करत एस.टी बस महामंडळाच्या विरोधात घोषणा देत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे तातडीने कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनी या जवळका एसटी बसचा प्रश्न लक्ष घालून तातडीने वेळेवर बस कशी येईल याकडे लक्ष घालावे अशीही मागणी जवळका येथील ग्रामस्थांनी केली आहे.
जर एसटी बसचा प्रश्न मार्गी लागला नाही तर यानंतरचे आंदोलन हे आणखी तीव्र स्वरूपाचे करण्याचा इशारा देखील विद्यार्थी व जवळ का येथील ग्रामस्थांनी दिला आहे. यानंतर जवळका ग्रामस्थांच्या वतीने जामखेड च्या संबंधित एस टी बसच्या अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. याबाबत नंदादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या वतीने देखील बस वेळेवर सोडावी यासाठी लेखी पत्र देण्यात आले आहे. दोन तासानंतर सदरचे आंदोलनात आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जवळका येथील शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष वाळुंजकर, बाबुरावान तात्या वाळुंजकर, कांतीलाल वाळुंजकर, सुदाम वाळुंजकर, गौतम बोराडे, लक्ष्मण खोसे, वर्धमान बोराडे, संभाजी देशमुख, लक्ष्मण वाळुंजकर सह विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here