प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

जामखेड प्रतिनिधी

जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर (आबा)
राळेभात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी (धनेगाव) येथे सकाळी ८.३९ वाजता वृक्षारोपण, सकाळी १०.३० वाजता श्री क्षेत्र सिताराम गड येथे अभिषेक व वह्यांचे वाटप करण्यात आले. शहरातील महावीर भवन येथे प्राध्यापक मधुकर आबा राळेभात मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ह.भ.प महाराजांचा सन्मान व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी शेतकरी, शिक्षक, डॉक्टर असोसिएशन, वकील बार संघटना, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्राध्यापक मधुकर (आबा) राळेभात यांचा सत्कार केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. कैलास शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद, निवृत्त कर आयुक्त नागेश जाधव, काँग्रेस तालुका अध्यक्ष शहाजी राजेभोसले, राजेंद्र कोठारी, दिलीप बाफना, सभापती पै. शरद कार्ले, सुर्यकांत मोरे, प्रकाश सदाफुले, हरिभाऊ बेलेकर, माजी सभापती गोरख शिंदे, मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहरभाई काझी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष महेश निमोणकर, प्राचार्य विकी घायतडक, उमर कुरेशी, वसिम कुरेशी, संतोष गव्हाळे, ह.भ.प ठाकरे महाराज, ह.भ.प गाडे महाराज, बापूसाहेब शिंदे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित चिंतामणी, मोहन पवार, अशोक शेळके, मोहन गडदे, इस्माईल सय्यद, मुख्तार सय्यद, इमरान कुरेशी, हर्षल डोके, महारुद्र नागरगोजे, अमित गंभीर, महालिंग कोरे, मयुर भोसले, अनिल बाबर, प्रा.राहुल आहिरे, सरफराज पठाण, दिपक खेडकर, प्रविण उगले,आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवव्याख्याते जाकीर शेख तर सूत्रसंचालन हनुमंत निकम यांनी केले व आभार प्रदर्शन अमित जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here