शेतकऱ्यास लुटणारे आरोपी जामखेड पोलीसांकडुन २४ तासात जेरबंद, गुन्हा केल्याची दिली कबुली
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील शेतकऱ्यास दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार आरोपींनी चुंबळी फटा येथे १ लाख ६४ हजार रुपयांना लुटले होते. मात्र जामखेड पोलीसांनी तपास करत याचोरट्यांना अवघ्या चोविस तासात जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड दि १५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता फीर्यादी विकास दत्तू मलंगनेर वय ४५ वर्ष धंदा शेती रा. नान्नज ता. जामखेड जि. अहमदनगर हे त्यांच्या कांदा विक्रीतून आलेली रक्कम रुपये १ लाख ६० हजार रुपये सोबत घेऊन जामखेड कडून नान्नजकडे जात असताना चुंबळी फाट्याजवळ अनोळखी चार आरोपी हे दोन मोटरसायकल वरून आले व त्यांनी फिर्यादी यांची मोटार सायकल अडवून फिर्यादी व त्यांचे सोबत असलेले साक्षीदार नामे अशोक मोहोळकर यांना मारहाण करून फिर्यादी यांची रोख रक्कम १ लाख ६० हजार रुपये व फिर्यादीचा मोबाईल जबरीने चोरी चोरुन जामखेडच्या दिशेने पळुन गेले होते. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चार आरोपींन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, कर्जत विभाग, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि. गौतम तायडे यांनी तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी भेट दिली होती. सदरील घटना घडल्याचे अनुषंगाने वरीष्ठांनी तपासाच्या सुचना देवुन तपास पथके तयार केली होती.
सदर गुन्ह्याचा तपास सपोनि.गौतम तायडे हे करीत असुन त्यांना जामखेड पेालीस स्टेशनचे पेालीस अंमलदार पोहेकॉ. प्रवीण इंगळे, पेाहेकॉ. अजय साठे, पोना. जितेंद्र सरोदे, पोना. संतोष कोपनर, पो कॉ. देविदास पळसे हे करीत होते. गुन्हयाचा शोध करीत असताना पोलीसांना गुप्त बातमीद्वारा माहिती मिळाली होती की, लुटमार केलेले आरोपी पारस ऊर्फ डुच्या काळे,व दिपक ऊर्फ दिद्या बलभिम पवार दोन्ही रा. आरोळे वस्ती, जामखेड ता.जामखेड यांनी व त्यांचे इतर साथीदार यांनीच सदरचा गुन्हा केल्याची खात्रीदायक माहिती मिळाली. यानंतर पोलीसांनी तातडीने आरोपी पारस ऊर्फ डुच्या काळे, दिपक ऊर्फ दिद्या बलभिम पवार दोन्ही रा. आरोळे वस्ती, जामखेड ता. जामखेड यांचे तपासकामी तात्काळ त्यांना पकडण्यासाठी वरील पथकास सुचना देवुन रवाना केले.
दिनांक १६ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता जामखेड पेालीस स्टेशनचे अंमलदार पोहेकॉ. प्रवीण इंगळे, पेाहेकॉ. अजय साठे, पोना.जितेंद्र सरोदे, पोना.संतोष कोपनर, पो कॉ. देविदास पळसे यांनी तात्काळ कुसडगाव रोड, वेताळ मंदीर, काझेवाडी तलावाजवळ सापळा लावुन तलावाच्या आडोशाला २ आरोपी लपुन बसलेले दिसले. ते पोलीसांना पाहुन तेथुन पळु लागले असता त्यांचा पोलीसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली.
या गुन्हयात कोण कोण आरोपी आहेत याबाबत विचारले असता त्यांनी गणेश विटकर व हरी माने (पुर्ण नाव माहिती नाही) रा.मुंजोबा गल्ली, जामखेड ता.जामखेड असा आम्ही सर्वानी मिळुन गुन्हा केला आहे आसे सांगितले. सध्या हे दोन आरोपी फरार आसुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेले पारस ऊर्फ डुच्या काळे व दिपक ऊर्फ दिद्या बलभिम पवार दोन्ही रा. आरोळे वस्ती, जामखेड ता.जामखेड यांना काल दिनांक १७ जुलै रोजी जामखेड न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.

सदर गुन्हयातील पाहिजे २ आरोपी पोलीसांना चुकवून फरार होते. जामखेड पेालीस स्टेशनच्या पथकाने त्यांचे मागावर राहुन आज दिनांक १८ जुलै रोजी जामखेड ते खर्डा जाणारे रोडवर गणेश विटकर व हरी माने रा.मुंजोबा गल्ली, जामखेड ता.जामखेड यांना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. आरोपी पारस ऊर्फ डुच्या काळे व दिपक ऊर्फ दिद्या बलभिम पवार दोन्ही रा. आरोळे वस्ती, जामखेड, गणेश विटकर, हरी माने रा. मुंजोबा गल्ली, जामखेड ता. जामखेड यांना अटक करून गुन्हयातील गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी कसोशिने प्रयत्न करीत आहोत.

सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधिक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे. अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत, यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि. गौतम तायडे, पोहेकॉ. प्रवीण इंगळे, पोहेकॉ. अजय साठे, पोना. जितेंद्र सरोदे, पोना. संतोष कोपनर, पोना.अविनाश ढेरे, पो कॉ. देविदास पळसे, पो कॉ. प्रकाश मांडगे, पो कॉ. कुलदिप घोळवे, यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here