समाजसेवी पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी सन्मानीत
जामखेड प्रतिनिधी
दै सकाळ सकाळ समुहाच्या वतीने जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना समाज सेवेतील सर्वोत्तम पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आल्याने सकल जैन समाज बाधव व व्यापारी वर्गानी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
अहमदनगर दै सकाळ च्या वतीने दर वर्षी वर्धापन दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील विविध क्षेत्रात सामाजिक व जनहिताचे काम करणाऱ्या विशेष समाज सेवी व्यक्तीच्या कामाचा लेखा जोखा घेऊन त्यांना दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्या बद्दल विशेष पुरस्कार देऊन दै. सकाळ समुहाच्या वतीने सन्मानीत करण्यात येत असते. त्याच पार्श्वभुमीवर यावर्षी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची या विशेष पुरस्कारासाठी दै सकाळ समुहाच्या वतीने निवड करण्यात आली होती.
त्यामुळे दि १ जुलै २०२४ रोजी अहमदनगर येथे सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणवीस, संपादक संभाजी पाटील, सहयोगी संपादक प्रकाश पाटील, वितरक रवींद्र पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, राज्याच्या संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, बाबासाहेब शेकड़े, भूषण देशमुख, दीपक देशमुख, देविदास आंधळे, मुरलीधर कराळे, अशोक निंबाळकर, संतराम सुळ, निलेश वनारसे मान्यवरांच्या उपस्थित सकाळ समुहाने त्यांना पुरस्कार प्रदान करत त्यांना सन्मानित केले असल्याने जामखेड येथील सकल जैन समाज बांधव व व्यापाऱ्यांच्या वतीने जामखेड येथे त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना शुभेच्छा देत दै सकाळ समुहाचे आभार व्यक्त करत धन्यवाद देणात आले.
यावेळी प्रफुल्ल सोळंकी, कांतीलाल कोठारी, सुनील कोठारी, डॉक्टर भरत दारकुंडे, अमोल तातेड, संजय बोरा, प्रवीण साहेब अशोक चोरडिया सुभाष भंडारी, सुभाष भळगट, किरण रेडे, कैलाश शर्मा, महेंद्र बोरा, संदीप सांगळे, संजय गांधी, अनिल फिरोदिया, सुमित चानोदिया गणेश भळगट, कालिदास गिरीसह सर्व मित्र परीवार उपस्थित होता.