रत्नदीप मेडिकल विरोधात पांडुराजे भोसले यांचे तिसर्या दिवशीही आमरण उपोषण सुरुच..
विद्यार्थींचे इतर मेडिकल कॉलेजमध्ये तात्काळ स्थलांतर करण्याच्या मागणीवर ठाम…
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्व शाखा मधिल सर्व विद्यार्थ्यांचे अश्वासन देऊनही इतर कॉलेज मध्ये तात्काळ स्थलांतर झाले नाही. त्यामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे दि २७ जुन पासुन जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. या प्रकरणी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे रायगड येथिल कमीटीने भेट देऊनही कमीटी कडुन समाधान कारक उत्तर न मिळाल्यामुळे उपोषणकर्ते पांडुराजे भोसले यांचे आज तिसर्या दिवशीही उपोषण सुरूच राहीले.
आज शनिवार दिनांक 29 जून रत्नदीप मेडिकल फाउंडेशन या कॉलेजच्या विरोधातील आंदोलनाचा आजच्या तिसरा दिवशी आंदोलन अधीक तीव्र होत आहे. तीन महिन्यापूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड चे पांडूराजे भोसले यांनी तीव्र आंदोलन सुरू करून ते नऊ दिवस अमरण उपोषणास बसले होते. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानुसार सर्व विद्यार्थ्यांचे तीन महिन्यात इतर कॉलेज मध्ये स्थलांतर होऊन सदरील संस्था व संस्थाचालक भास्कर मोरे यांच्या वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासित केल्यामुळे सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते, परंतु आज तीन महिने झाले तरी विद्यार्थ्यांचे ट्रान्सफर झालेले नाही व सदर संस्था व संस्था चालक भास्कर मोरे वरती विद्यापीठ व शासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने पुन्हा पांडुराजे भोसले व सर्व विद्यार्थी दिनांक 27 जून पासून आंदोलनास बसले आहेत.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे रायगड या विद्यापीठामार्फत डॉ प्रदीप बोडखे व एस आर भगत यांनी विद्यापीठा मार्फत होत असलेल्या कारवाईबाबत उपोषण स्थळी येऊन अस्वस्थ केले परंतु विद्यापीठाकडून होत असलेली कारवाई समाधानकारक नसून विद्यापीठाचा वेळ काढू पणा आहे असे दिसून येत आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांचे स्थलांतर होत नाही व आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण असेच चालू राहणार आहे व यादरम्यान कोणाच्या जीवितास काही हानी झाल्यास व एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास विद्यापीठ व प्रशासन संपूर्ण जबाबदार असणार असे मत यावेळी पांडुरंग भोसले यांनी व्यक्त केले.
असे बोलत असताना सदरील संस्था व संस्थाचालक भास्कर मोरे यांनी विद्यापीठाची केलेली फसवणूक, विद्यार्थ्यांची केलेली आर्थिक, शारीरिक व मानसीक पिळवणूक, विद्यार्थ्यांना धमकावून जमवलेली अब्जावधी रूपयांची संपत्ती, मुख्यमंत्रीसाहेब यांच्या आश्वासना नंतर स्थापन केलेल्या समितीवरील कार्यवाही, संस्थेच्या नियम व त्यांचे उल्लंघन करून धर्मदायक त्यांची केलेली फसवणूक या अशा सर्व प्रकरणाची वेगवेगळे गुन्हे संस्था व भास्कर मोरे यांच्यावर दाखल करून त्यांच्यावर योग्य कारवाई करावी.
तसेच कॉलेजच्या आवारामध्ये दोन हरीण पाळल्याबद्दल वनविभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यातील एक हरीण जखमी अवस्थेत कॉलेजच्या आवारात सापडले परंतु त्या व्हिडिओ मधील दुसर्या हरणाचे काय झाले ते कुठे गेले तसेच कॉलेजच्या आवारात आढळून आलेले हरणाचे अवशेष हे कोणत्या हरणाचे आहेत ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे या सर्व बाबींचा उलगडा होऊन प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत संस्था व संस्थाचालक यांच्यावर फास्टट्रॅक कोर्टात केस चालून लवकरात लवकर कार्यवाही व्हावी वन विभाग कडून देखील होत असलेल्या कार्यवाहीवर पांडुरंग भोसले यांनी खंत व्यक्त केली व वनविभाग कडून सदरील संस्था व भास्कर मोरे यांच्यावर कारवाई न झाल्यास याबाबत भविष्यात मोठे आंदोलन उभा करून असा इशारा दिला.