वाघा येथे विजेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू , पती-पत्नी थोडक्यात बचावले.
जामखेड प्रतिनिधी
शेतातील काम संपल्यानंतर बैलगाडीतून संध्याकाळी पती-पत्नी घरी परतत होते. यावेळी अचानक विद्युतपोलचा वीजप्रवाह रस्त्यावरील पाण्यात उतरला होता. याचा दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाडीच्या बैलांना विजेचा शॉक बसल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. मात्र प्रसंगावधान राखून पती व पत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या आपघातुन बालंबाल वाचवले.
ही घटना काल दि २० जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील वाघा गावात घडली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की वाघा गावातील शेतकरी सुखदेव बबन बारस्कर हे आपल्या पत्नीसह बैलगाडीतून सकाळी शेतात गेले होते. दिवसभर शेतातील काम ओटपुन संध्याकाळी आपल्या घरी परतत होते. यावेळी पाऊस देखील सुरु होता. तसेच बैलगाडीत गवताचे भारे टाकुन पती पत्नी हे बैलगाडीतून आपल्या घरी येत असतानाच वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीजप्रवाह पावसाने रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरला होता.
यावेळी बैलगाडी या पाण्यातून जात असतानाच अचानक या बैलांना विजेचा धक्का बसल्याने बैलगाडीला जुंपलेल्या दोन्हीही बैलाचा जागीच मृत्यू झाला तर प्रसंगावधान राखून बैलगाडी मध्ये गवताच्या वरती बसलेल्या पती पत्नी यांनी गाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या आपघातुन बालंबाल वाचवले आहेत. याबाबत शेतकर्‍याच्या दोन्ही बैलांचा या अपघातात दुर्दैवी मुत्यू झाला आहे. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने तातडीने घटनेचा पंचनामा करुन संबधित विभागाकडून या शेतकर्‍यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थान कडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here