सोनम वांगचुक यांच्या उपोषणास जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचा पाठिंबा

जामखेड तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना दिले निवेदन

जामखेड प्रतिनिधी

सरकारच्या हलगर्जीपणामुळे नीट व टीईटी पेपर फुटले अनेक विद्यार्थ्यांनी यामुळे आत्महत्या केल्या देशातील शिक्षण वाचविण्यासाठी गेल्या एकवीस दिवसांपासून विख्यात शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते डॉ. सोनम वांगचुक उपोषणास बसले आहेत. नीट व टीईटी पेपर फुटी बाबत सरकार असंवेदनशील आहे असे मत ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे यांनी व्यक्त केले.

जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देऊन डॉ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला यावेळी शिवाजीराव ढाळे ज्येष्ठ शिक्षक नेते, माजी मुख्याध्यापक रमेश अडसूळ, पी. टी. गायकवाड, मुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, भरत लहाने, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, सेक्रेटरी संतोष पवार, मयुर भोसले, प्रा. सुनिल घाडगे, हनुमंत वराट मुकुंद राऊत, मोहन यादव, दिनेश शिंदे, सुभाष बोरोटे, आण्णा विटकर यांच्या सह अनेक शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

यांच्या आमरण उपोषणास जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यासंदर्भात आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार, जामखेड यांना निवेदन दिले यावेळी भारत माता की जय, भारतीय लोकशाहीचा विजय असो अशा घोषणा दिल्या.

डॉ. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत जामखेड तालुका शिक्षक संघटनेची भूमिका निवेदनात संघटने म्हटले आहे की, डॉ. वांगचुक हे देशातील तरुणांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श आहेत. त्यांनी शिक्षण आणि पर्यावरणाला जोडून दाखवून दिले. अशा व्यक्तीला उपोषणाला बसावे लागणे ही देशासाठी चिंतेची बाब आहे.

 

मुख्य मागण्या

1. सोनम वांगचुक यांच्याशी तातडीने चर्चा करून प्रश्न सोडवावा
2. उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशा मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात सर्कल ए. एल शिरसाट यांना देण्यात आले. व सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचा जाहीर पाठिंबा जाहीर केला.

निवेदनात काय म्हटले?

सोनम वांगचुक यांनी शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, NEET-TET परीक्षेतील घोळ आणि शिक्षण विभागातील भ्रष्टाचार यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारने अद्याप यावर तोडगा न काढल्याने “Save Education Save Nation” या तत्वावर काम करणाऱ्या शिक्षक संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.

चौकट

केंद्र सरकारकडे सोनम वांगचुक यांच्याशी तातडीने चर्चा करून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याची आणि हे निवेदन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here