जनावरांना बैलगाडीतुन चार घेऊन घराकडे जात असताना वाटेतच खड्यामुळे बैलगाडी उलटुन झालेल्या अपघातात तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. ही घटना तालुक्यातील बांधखडक येथिल चव्हाण वस्ती या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मयत गणेश मधुकर चव्हाण, वय अंदाजे २८ वर्षे, रा. चव्हाण वस्ती बांधखडक ता. जामखेड हा गुरवार दि १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात जणांनवरांना चारा आणण्यासाठी त्याचे चुलते बाळु गोरख चव्हाण यांच्या सोबत गेला होता. यावेळी गणेश व त्याचे चुलते चारा घेऊन बैलगाडीतुन आपल्या चव्हाण वस्तीकडे येत असताना खैरी नदिच्या जवळील रस्यावर खड्डा आसल्याने या खड्यात बैलगाडी आदळली व बैलगाडीचा टायर उडुन सदरची बैलगाडी उलटली या आपघातात गणेश चव्हाण हा बैलगाडी खाली दबला गेला व मेंदुला मार लागल्याने तो या आपघातात गंभीर जखमी झाला होता. तर त्याचे चुलते बाळु चव्हाण हे देखील जखमी झाले होते.

यानंतर गंभीर जखमी गणेश चव्हाण यास ग्रामस्थांनी तातडीने मोटारसायकलवर खर्डा येथील हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी बार्शी येथिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र गणेश याचा रस्तातच येताना मृत्यू झाला आसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गणेश चव्हाण याची घरातील परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याच्या मागे वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. गणेश यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यावर रात्री सात वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here