Home ताज्या बातम्या मुलांना शिक्षणासोबत संस्कार महत्त्वाचे- पायलताई बाफना

मुलांना शिक्षणासोबत संस्कार महत्त्वाचे- पायलताई बाफना

मुलांना शिक्षणासोबत संस्कार महत्त्वाचे- पायलताई बाफना

एकलव्य व तक्षशिला स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन साजरा

जामखेड प्रतिनिधी

मुलांना शिक्षणासोबत संस्कार महत्त्वाचे आहेत, शहरासह तालुक्यातील विद्यार्थिनी व महिलांच्या स्वावलंबनासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने काम करत राहणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या पायलताई आकाश बाफना यांनी केले.

शहरातील एकलव्य व तक्षशिला प्रायमरी स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १ मे रोजी सकाळी पायलताई आकाश बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शिवसेना युवा नेते आकाश बाफना, पोलीस उपनिरीक्षक गणेश भागडे, पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे, प्रल्हाद जावळे, शिवाजी डोंगरे, विजय टेकाळे, पत्रकार धनराज पवार, अमोल लोहार तसेच मुख्याध्यापक अशोक जावळे, अशोक आजबे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आकाश बाफना यांनी बोलताना सांगितले की, शहर व तालुक्यातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य आहेत. एकलव्य व तक्षशिला प्रायमरी स्कूलमध्ये मंथन स्पर्धा परीक्षा नियमित घेतल्या जात असून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार दिले जातात. यामुळेच या शाळेकडे पालक व विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येत आहे.

यावेळी पायलताई बाफना व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका रेखा फुले, पल्लवी बेंद्रे, स्वाती तवटे, कालिंदी पोकळे, ज्योती नागरगोजे, निता काळे, उषा ढोले, रेखा निगुडे, अश्विनी महारनवर व मदतनीस द्रौपदी खराडे आदींनी परिश्रम घेतले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!