

जामखेडच्या तुषार बोथरा याच्या विरोधात वंचितचे आंदोलन.
सुजातदादा आंबेडकर यांच्याबद्दल केले होते चुकीचे व्यक्तव्य
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील येथील रहिवाशी आसलेल्या तुषार बोथरा याने दि. १९ मे २०२६ रोजी फेसबुक या सोशल मिडीया प्लॅटफार्मवर एक अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक कमेंट केली आहे. सदर कमेंट ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव तसेच पक्षाचे राज्याचे नेते आदरणीय सुजात (दादा) आंबेडकर यांच्याबाबत करण्यात आली आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने वंचितचे राज्य प्रवक्ते एडवोकेट डॉ.अरूण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलिस स्टेशन येथे तीव्र स्वरूपात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले आहे.

या अत्यंत खालच्या पातळीवरील कमेंटमुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि वारसाचा घोर अपमान झाला असुन, संपुर्ण आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत. या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे जामखेड शहर व परिसरातील आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट असुन, शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून कायदा व सुव्यवस्था बिघडण्यापूर्वी सदर इसम तुषार बोथरा याच्यावर आयटी अँक्ट व संबंधित कायदेशीर कलमांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्याला ताब्यात घ्यावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. जर या इसमावर त्वरित कडक कार्यवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी व समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या या तीव्र आंदोलनामुळे जामखेड पोलिसांनी तातडीने दखल घेऊन सदर आरोपी तुषार बोथरा याला ताब्यात घेतले आहे.

वंचितच्या या तीव्र आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट), संभाजी बिग्रेड, मुस्लिम पंच कमिटी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंच, ओबीसी संघटना आदिंनी जाहीर पाठिंबा देत सदरील घटनेचा निषेध केला आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते नगरसेवक एडवोकेट डॉ.अरूण (आबा) जाधव, जामखेड नगरपरिषदेच्या नगसेविका सौ. संगिताताई भालेराव,नगरसेवक प्रशांत राळेभात, नगरसेवक वसीम सय्यद, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहरभाई काझी, संभाजी बिग्रेडचे अवधूत पवार, वकील बार संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट हर्षल डोके, भारतीय बौध्द महासंघाच्या सुरेखाताई सदाफुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंचचे अध्यक्ष गणेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते रिजवान बागवान, लोकअधिकार आंदोलनाचे बापू ओव्हळ, मुख्तार सय्यद, जुबेर शेख, अंकल घायतडक, नितिन जाधव, सतिष जाधव, परशुराम, जाधव, आदिल शेख, दिलिप गायकवाड, सुमित भालेराव, अक्षय समुद्र, मनोज घायतडक, शेखर कांबळे, योगेश बनसोडे, आरीफ बागवान, सुभाष फुलमाळी सर, विक्की गायकवाड, गणेश घायतडक, बाबा ओव्हळ, अनिल सदाफुले, सागर कांबळे आदि. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.









