रोखठोक जामखेड….

शिवनेरी अकॅडमी मध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा ५८ वा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. या वेळी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक काम करत आसलेल्या कोठारींच्या कामाचे कैतुक करण्यात आले.

शुक्रवार दिनांक ५ मार्च २०२१ रोजी सकाळी ७ वाजता सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर सर्व उपस्थितांच्या कडून माननीय सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी शिवनेरी अकॅडमी चे संचालक कॉप्टन लक्ष्मण भोरे यांनी देखील सांगितले की संजय कोठारी हे नेहमी एकटेच अपघात ग्रस्तांना वाचवण्यासाठी जात आसतात. त्यांना यावेळी कोणी मदत करत नाहीत त्यांना कोठे आपघाताच्या ठीकाणी अचानक मदत लागली तर शिवनेरी अकॅडमी चे जवान नेहमी कोठारी यांच्या मदतीसाठी धावुन येतील व आपले कर्तव्य पार पाडतील.

यावेळी विठ्ठलआण्णा राऊत म्हणाले मी गेली चार पिढ्या पासून कोठारी परिवारांचे कार्य पाहत आहे. संजय कोठारी हे वीस वर्षापासून सातत्याने काम करत आहेत दोन महिन्यापूर्वी सौताडा घाटातील डोंगराला आग लागली होती त्यावेळेस त्यांनी मला फोन केला व त्यांच्या सोबत मी मदत केली. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अमित गंभीर म्हणाले असा समाजसेवेचा अवलिया अद्याप मी पाहिलाच नाही केव्हाही त्यांना कसलही काम सांगा ते तत्पर धावून येतात. संजय कोठारी यांचे कार्य खरोखर वाखाणण्याजोगे आहे यावेळी विठ्ठलआन्ना राऊत ,शिवनेरी अकॅडमी संस्थेचे संचालक लक्ष्मण भोरे, ज्येष्ठ वयोवृद्ध गोविंदराव भोरे ,अमित गंभीर, पत्रकार अविनाश बोधले, पत्रकार धनराज पवार ,विजय नागरगोजे फिजिक्स टीचर, कॉन्ट्रॅक्टर डोंगरे साहेब प्रशांतशेठ आरोरा, रवी जमदाडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here