रोखठोक जामखेड……
वाहतूक सप्ताह निमित वहातूक पोलीसांनकडुन जामखेड येथील रोडवरील रिक्षा चालक, कर चालक व टेम्पो चालक यांच्याशी संपर्क साधुन त्यांना सुरक्षिततेच्या बाबतीत संबोधित करण्यात आले.
रस्ता सुरक्षा वाहतुक सप्ताह अंतर्गत सदरचा सप्ताह दि १८/०१/२०२१ ते १७/०२/२०२१ पर्यन्त आयोजित करण्यात आला आहे. या मध्ये रोडवरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकां मध्ये जागृती यावी म्हणून रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम जामखेड शहरातील वाहतुक शाखेच्या वतीने राबवण्यात येत आहे. सुरक्षित वाहने चालवा व आपला जीव वाचवा ह्या अभियाना अंतर्गत वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यासाठी एकीकडे धडक मोहीम व जनजागृती सुरू आहे.
जामखेड शहरातील बस स्टँड, तसेच प्रमुख चौकात कॉर्नर मीटिंग आयोजित करून सुरक्षित रित्या वाहने चालवून आपण अपघात कमी करू शकतो त्या साठी कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच असुरक्षित वाहने चालविण्याचे दुष्परिणामाची माहिती यावेळी जामखेड पोलीस स्टेशन च्या वाहतुक पोलीसांच्या वतीने सांगण्यात आली.
सदरची कार्यवाही मा.पोलिस अधीक्षक मनोज कुमार पाटील सो, मा उपविभागीय पोलिस अधिकारी आणासाहेब जाधव सो तसेच पो. नि.संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अंतर्गत प्रबोधन करण्यात येत आहे.






