पती कडुन झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंटचा पेवर ब्लाॅक घालून केला खून, आष्टी शहरातील घटना

आष्टी। प्रतिनिधी

मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत आसलेल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंट चा ब्लॉक मारुन पतीने पत्नीचा खून केला. या घटनेमुळे आष्टी शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील फुलेनगर येथे ही घटना घडली आहे. निलम संभाजी वाल्हेकर आसे मयत पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती संभाजी वाल्हेकर यास अटक केली आहे.

सदरची घटना आज दि १४ एप्रिल रोजी मध्यरात्री च्या सुमारास घडली आहे. दौलत शिवाजी वाल्हेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझा भाऊ संभाजी हा त्याची पत्नी नीलम २ मुलासह माझ्या घराच्या बाजूस कुटुंबासह राहतात संभाजीच्या कमरेला मार लागल्याने तो घरीच असतो तो काही काम करत नव्हता त्याची पत्नी निलम ही मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवते. भाऊ संभाजी शिवाजी वाल्हेकर दारू पिण्यासाठी पत्नीकडे नेहमी पैशाची मागणी करायचा नाही दिले तर हाणमार करून जीवे मारण्याची धमकी देत होता. बरेच वेळा मी भांडण सोडवले आहेत.

गुरूवारी मध्यंरात्री २ वाजण्याच्या सुमारास माझा पुतण्या सुरज घरी मोठ्याने ओरडत आला होता त्याला मी काय झाले विचारले असता तो मला म्हणाला की घरी चला पप्पा ने मम्मीला डोक्यात मारले त्यावरून मी व माझी पत्नी, भाऊ गणेश असे आम्ही घरी गेलो असता संभाजी याने घरासमोरील अंगणामध्ये माझी भावजय लोखंडी पलंगावर पडलेल्या स्थितीत होती तिथेच बाजूला माझी आई मोठ्याने रडत होती भाऊ संभाजी घराच्या भिंतीजवळ बसलेला होता सिमेंट काँक्रीट चा पिवर ब्लॉक तिथे होता भावजयीच्या डोक्यात पाहिले असता पाठीमागील बाजूस गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव होत होता मोठमोठ्याने आवाज देऊनही तिला हलवण्याचा प्रयत्न केला तरी ती प्रतिकार देत नव्हती संभाजी आणि डोक्यात सिमेंट पेवर ब्लॉक मारून जीवे ठार मारले आहे.

घटना कळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलिस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख,पी एस आय प्रविण काळे,पो का सचिन पौळ, प्रविण क्षिरसागर यांनी भेट दिली.आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत आष्टी पोलिस ठाण्यात पती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here