रोखठोक जामखेड

शहरातील तपनेश्वर रोड येथील अमरधाम(स्मशानभुमी) येथे सकाळी ८ वाजता संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट जामखेड तर्फे स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. सुमारे तीन तास श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.

यावेळी संत निरंकारी सेवा चॅरीटेबल ट्रस्ट रजि ,दिल्ली शाखा जामखेड चे तालुका समन्वयक अमित गंभीर ,नगरसेवक दिगांबर चव्हाण ,अमोल गिरमे, रवि जमदाडे, दिपक मोरे, लक्ष्मण ढेपे सर, शाम जमदाडे, कृष्णा गिते, विकास साबळे, अखिलेश डाडर, व महिला रश्मी गंभीर, रेखा गंभीर, वंदनाताई राळेभात, सूर्यवंशी ताई, जाधव ताई इत्यादी सेवेकरी उपस्थित होते.

जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथील अमरधाम (स्मशानभुमी )परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे होती. त्यामुळे त्या ठिकाणी त्यामुळे ती झुडपे काढुन झाडू व खराट्याच्या सहाय्याने त्या ठिकाणी साफसफाई करण्यात आली. सदरची स्वच्छता मोहीम तीन तास चालली. भारत सरकारच्या स्वच्छ अभियान मध्ये देशभरात या उपक्रमास भरपूर प्रतिसाद असल्यामुळे हे सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. याच भावनेतून आपण मंडळाच्या सहभागाने हा परिसर स्वच्छ करीत आहे. असे मत तालुका समन्वयक अमित गंभीर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here