रोखठोक जामखेड….
भारतीय जनता पक्षाच्या अहमदनगर जिल्हा उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षापदी अहमदनगर मतदार संघ विस्तारक व जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी संचालक मनोज कुलकर्णी यांची तर भारतीय जनता पक्षाच्या विधीआघाडीच्या जिल्हाध्यक्षापदी प्रविण सानप यांची निवडी करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे व जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांच्या हस्ते नूकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल प्रदेशउपाध्यक्ष माजी मंत्री प्रा राम शिंदे ,खा सुजय विखे पाटील, आ. मोनिकाताई राजळे ,आ. बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले ,जेष्ठ नेते अभयजी अगरकर, माजी जिल्हाअध्यक्ष भानुदासजी बेरड सर, जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अमजद पठाण, तालुकाध्यक्ष अजय काशीद, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसादजी ढोकरीकर ,जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर,कुंभार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल राऊत,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चेअरमन संजय कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ ज्ञानेश्वर झेंडे, शहरध्यक्ष बिभीषण धनवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे अनिल लोखंडे, माजी संचालक पोपट राळेभात माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात,माजी संचालक पांडूरंग उबाळे, युवामोर्चा तालुका अध्यक्ष पै शरद कार्ले, यांच्या सह जिल्हय़ातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुलकर्णी व सानप यांचे अभिनंदन केले आहे.






