पाथर्डी रोखठोक

पाथर्डी येथील कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर खाजगी बस व कारच्या झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात पाथर्डी येथील देवराई जवळ रात्री झाला आसल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातात रामभाऊ शंकरराव कदम (रा. बीड), परमेश्वर लक्ष्मण काळे (रा. परभणी) व केशव विठ्ठल बोराटे (जि. जालना), अशा तीघा मृतांचे नावे समजू शकली आहेत. तर उद्याप चौथा मृत्यू झालेल्या व्यक्ती चे नाव समजु शकले नाही. पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्रिभुवनवाडी शिवारात खाजगी बस ही पुण्याहून नांदेडकडे जात होती. कार ही पुण्याच्या दिशेने चालली होती. यांचा अपघात होऊन कारमधील चौघांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here