दोन आमदारांनी द्वेषाचे राजकारण करण्यापेक्षा विकास कामांच्या स्पर्धेचे राजकारण करावे – कैलास माने
जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेड मतदारसंघातील दुष्काळी भागाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. राम शिंदे आणि आ. रोहित पवार यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात हे दोन्ही नेते एकमेकांन विरोधात द्वेषपुर्ण टीका करत आहेत. यामुळे मतदारसंघाचा विकास खुंटला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांनी एकमेकांन विरोधात द्वेषाचे राजकारण करण्याऐवजी विकास कामांच्या स्पर्धेचे राजकारण करणे गरजेचे आहे असे विधान शिवसेना (शिंदे गट) जामखेड तालुका प्रमुख यांनी लावला आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघातील दोन आमदारांन मधिल संघर्ष अधिक टोकदार वळणावर येऊन ठेपला आहे .एकमेकांचे कट्टर विरोधक आसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार आणि भाजपचे विधान परिषदेचे आ.प्रा राम शिंदे एकमेकांवर टीका करत आहेत. याच अनुशंगाने शिवसेना (शिंदे गटाचे) जामखेड तालुका प्रमुख प्रा. कैलास माने सर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली व आपली परखड भुमिका व्यक्त केली.
पुढे बोलताना प्रा कैलास माने सर म्हणाले की जामखेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही आमदारांनी एकत्र आले पाहिजे. सध्या सुरू असलेले एक एकमेकांन विरोधातील द्वेषाच्या राजकारणा पेक्षा विकासाचे राजकारण करणे महत्त्वाचे आहे. कर्जत जामखेड हा मतदारसंघ कायमस्वरूपी दुष्काळी आहे. जामखेड शहरासाठी विषेश पाणीपुरवठा योजना तीन वर्षांपूर्वी मंजुर झालेली असताना अद्याप आठ दिवसाआड पाणी जामखेड शहराला मिळत आहे. तसेच वास्तविक पहाता शहराची हद्दवाढ हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. बहुतांश ठीकाणी नवीन आसलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये विस्तारीत हद्द वाढ झालेली आहे. परंतु जामखेड शहरामध्ये अद्याप (D P) प्लॉन शहर विकास आराखडा मात्र तयार झालेली नाही. त्याच प्रमाणे गुंठेवारी देखील बंद झाली आहे त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
जामखेड मधिल सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न देखील मोठा गंभीर होऊन बसला आहे. विकास कामांना नीधी आनण्या एवजी दोन्ही आमदारांनी टीका टीपन्नी करण्यावर अधिक भर दिला आहे. सध्या जामखेड शहरातील व्यापार पेठ थंड आहे. नविन उद्योग धंद्यासाठी लागणारे भांडवल कोठुन आनणार कारण दोन वर्षांपासून कोरोनाने नागरिकांना मोठी आर्थिक हाणी पोहचली आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांनी द्वेषाचे राजकारण बाजुला ठेऊन शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत शिवसेनेचे शिंदे गटाचे जामखेड तालुका प्रमुख प्रा कैलास माने सर यांनी व्यक्त केले.


