

कर्जत ते कोंभळीफटा रस्त्यास नीधी कमी पडु देणार नाही. आ. प्रा. राम शिंदे
कर्जत प्रतिनिधी
राज्यात झालेला सत्ता बदल या रस्त्याचे भाग्य उजळिवणारा ठरला आहे. तसेच वनविभागाची परवानगी मिळाली असून आता या रस्त्याच्या कामाला निधी कमी पडून दिला जाणार नाही असे मत आ. प्रा राम शिंदे यांनी सांगितले. कोंभळी फाटा ते कर्जत हायब्रीड अँन्युटी या शीर्षकाखाली आ. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून अंदाजे 61 कोटीच्या मंजुरी दिलेल्या रस्त्याच्या कामाची आ पहाणी त्यांनी केली.


या ठीकाणी सुरू आसलेल्या कामाच्या बाबतीत नाराजी व्यक्त करत सदरचे काम दर्जेदार करा गाठ माझ्याशी, आहे असा इशारा आ. प्रा राम शिंदे यांनी संबंधित ठेकेदार व एजन्सी आणि अधिकार्यांना दिला. आ. प्रा राम शिंदे हे फडणवीस सरकार मध्ये असताना त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील कोळंभी फाटा ते कर्जत हा महत्त्वाचा रस्ता मंजुर करुन आणला होता. सदर रस्त्याचे भूमिपूजन होऊन कामास सुरुवात झाली होती. परंतू पुढे सरकार बदलल्याने काम रेंगाळले होते. नीधी न मिळाल्याने काम ठप्प झाले होते.

गेली ३ वर्षे मविआ सरकारच्या काळात या रस्त्यावर अघोषित स्थगिती होती. रस्ता कामासाठी खोदला होता त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले होते परंतु या सर्व गोष्टीकडे प्रशासन आणि लोक प्रतिनिधी सोयीस्करपणे डोळेझाक करत होते.कधी वनविभागाच्या परवानगी च्या नावाखाली तर कधी एजन्सी च्या नावाने सबब सांगून काम बंद पाडून जनतेची दिशाभूल चालू होती.

राज्यात झालेला सत्ता बदल या रस्त्याचे भाग्य उजळिवणारा ठरला आहे. त्यामुळे आ. प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नाने वनविभागाची परवानगी मिळाली असून आता या रस्त्याच्या कामाला निधी कमी पडून दिला जाणार नाही असे आ. प्रा राम शिंदे यांनी सांगितले.

परंतु आ. राम शिंदे यांनी हा महत्वाचा रस्ता इतके दिवस बंद का होता ? असे विचारले असता सर्व अधिकारी निरुत्तर झाले संबंधित एजन्सीने तत्कालीन सरकारने पैसे अडवून ठेवल्याचे सांगितले. रस्त्याच्या गुणवत्तेसंबंधी गुणवत्ता तपासणी एजन्सीला प्रश्न विचारले असता तेही निरुत्तर झाले झालेल्या कामाच्या दर्जा बाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत सदर कामाची दुसऱ्या गुणवत्ता नियंत्रक कंपनी कडून तपासणी करावी आणि त्या संदर्भात पुढील आठवड्यात मंत्रालयीन स्तरावर मिटिंग घेण्याचे सूतोवाच केले.
रस्ता देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित एजन्सी कडे १० वर्ष आहे याचा अर्थ दहा वर्षे त्या रस्त्याला दुरुस्ती होऊ नये असा आहे आणि तो दहा वर्षे टिकेल इतका दर्जेदार असावा .. परंतु १०वर्ष तर दूरच दुसऱ्या वर्षी पासून रस्ता खराब होतो आणि मग एजन्सी ते खड्डे भरण्याचे काम करते हे अपेक्षित नाही त्यामुळे गुणवतेच्या बाबतीत कोणतीही कसूर करू नये . . संबंधित यंत्रणेला योग्य सूचना देऊन रस्ता जनतेसाठी दर्जेदार कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत .

शासनाकडून कोणत्या ही प्रकारचे सहकार्य होईल त्याबाबत एजन्सी ने काळजी करू नये परंतु रस्त्याच्या दर्जाबाबत अजिबात तडजोड करू नये. याप्रसंगी सा .बा विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, उपअभियंता कर्जत विभाग प्रशांत वाकचौरे, शाखा अभियंता बहिरजी शिंदे साहेब, विशाल शर्मा तसेच कोठारी कन्स्ट्रक्शन एजन्सीचे अनिल कोठारी, आदि अधिकारी तसेच जिल्हा बैंकेचे संचालक अंबादास पिसाळ , सचिन पोटरे, अशोक खेडकर, गणेश क्षीरसागर, पप्पू शेठ धोदाड, गणेश पालवे, शेखर खरमरे, सुनील यादव, ज्ञानदेव लष्कर अनिल गदादे व इतर कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .






