बापरे! आष्टी तालुक्यात झाली तब्बल ढगफुटी. अनेक गावांचा तुटला संपर्क

जामखेड-नगर रोडवर झाले पाणीच पाणी

आष्टी प्रतिनिधी:१३ ऑक्टोबर(अक्षय विधाते)

आष्टी तालुक्यातील पांढरी गावपरिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. तब्बल 4 तास पडलेल्या या पावसाने पांढरी गावासह जामखेड -अहमदनगर मुख्य महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. तर तालुक्यातील अनेक गावखेड्यातील नद्यांसह ओढ्यांना पूर आलाय. यामळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. 

पांढरी परिसरातील आष्टा महसूल मंडळात सकाळी ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जामखेड – अहमदनगर महामार्गावर वाहतूक विस्कळित झाली आहे. रोड वरुन‌ गुडघ्या पर्यंत पाणी वाहत होते. प्रवासी जिवे धोक्यात घालून प्रवास करत आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हातातील पीक गेल्याने हवालदिल झाले आहेत.तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असुन मागिल १५ दिवसांपासून पाठ सोडायला पाऊस तयार नाही आज पुन्हा सकाळ पासूनच ढगफुटी सदृश्य पाऊस झाला जोरदार पावसाने पांढरी, करंजी, पांगुळगव्हाण, क-हेवडगांव, क-हेवाडी, मातकुळी, वनवेवाडी, पोखरी,हाजीपुर,या परिसरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले नदी नाल्यांना पुर आल्याने वाहतूक ठप्प आहे. काही गावांचा संपर्क देखील तुटला गावातील ग्रामस्थांना पुलावरून पाणी वाहत असल्याने अडकून पडले होते. विद्यार्थी, नौकरदार, दुध घेऊन जाणारे शेतकरी जोरदार पावसामुळे घरातच अडकून पडले आहेत.

पांढरी व आष्टा महसूल मंडळ परिसरात सकाळी ९ वाजेपासून पावसाने हाहाकार माजवला असुन शेत जलमय झाले आहेत.पूर्ण शेत पिक पाण्याखाली आहे. शेतक-यांचे अतोनात नुकसान झालं शेतांना तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाल्याने सोयाबीन कोंब येण्याची भीती आहे. कापुस, कांदा, तुर पीक शेतात झोपल्याने झडण्यासह पाण्यात कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोसावलेली पिके अशा पद्धतीने संकटात आल्याने बळीराजाचे दु:ख काही संपत नाही, अशी स्थिती आहे.

चौकट

सोलेवाडी चा पुल तुटल्याने ८ ते १० गावांचा संपर्क तुटला नदी शेजारील घरात पाणी घर सोडून नागरीकांचे स्थलांतर

तालुक्यातील सोलेवाडी येथील नगर जिल्ह्यातील गावांना जोडणारा पुल परतीच्या पावसाने वाहुन गेला आहे. सकाळपासून पूर आल्याने या मार्गावरील जामगांव, देविगव्हाण, वाळुंज, डोणगाव, अरणगाव, पारेवाडी, या गावातील विद्यार्थी, नौकरदार, नागरिक वाहतूक दुपारपर्यंत ठप्प आहे. या गावांचा संपर्क तुटला आहे. तर सोलेवाडी येथील नदीच्या बाजूच्या घरात पाणी शिरले असून जिवन उपयोगी वस्तू पाण्यात आहेत.अतोनात नुकसान ह्या पावसाने झाले आहे.पुरस्थिती निर्माण झाली आहे.तात्काळ शेतकऱ्यांना मदत देऊन पूल बांधण्याची मागणी राम झगडे यांनी केली आहे.

चौकट

पांढरी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने शेत जलमय जमिन खोदून गेल्या बळीराजाचे अतोनात नुकसान

सकाळपासूनच पांढरी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून गावातील शेतकऱ्यांनी कांदा, ज्वारी पिकाची पेरणी केली आहे.व‌ कापुस तुर,कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.सर्व पिके पाण्यात असून जमिन खोदून गेली आहे.बळीराजाचे आस्मानी संकटाने अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत ही दिवाळी पूर्वी द्यावी जेणेकरून बळीराजाची हि दिवाळी गोड होईल

सुधिर पठाडे ( सरपंच, पांढरी )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here