जामखेड प्रतिनिधी

पैसै देण्याच्या बहाण्याने मोटार सायकलवर बसवुन त्याचे आठ दिवस अपहण व मारहाण करुन नव्वद हजार रुपयांचा ऐवज लुटला. या नंतर पुन्हा फीर्यादीस आठ दिवसा नंतर त्याच्या गावी सोडण्यात आले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडीत तरुणाने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एकुण चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की फीर्यादी भागवत ज्ञानोबा चौधार वय २९ रा. नागोबाचीवाडी. ता. जामखेड यांनी आपल्या सासर्‍याकडुन पन्नास हजार रुपये उसने घेतले होते. ते पैसै देण्यासाठी ते वाघीरा या गावी चालले होते. दरम्यान याच वेळी फीर्यादी च्या नागोबाचीवाडी या गावातील आरोपी बळीराम सिताराम गोपाळघरे, तुकाराम सिताराम गोपाळघरे, सिताराम निवृत्ती गोपाळघरे तिघे रा. नागोबाचीवाडी व शत्रुघ्न मधुकर सानप रा. सौताडा अशा चौघाजणांनी फीर्यादीस म्हणाले की आम्ही पण सौताडा येथे मुकादमाकडे चाललो आहोत. आपण बरोबरच जाऊ व पुढे जाऊन वाघीरा येथे तुमच्या सासर्‍याचे पैसै देऊन येऊ आसे म्हणून आरोपी नंबर एक ते तीन यांनी फीर्यादस त्यांच्या मोटारसायकलवर बसवुन आरोपी नं चार याच्या सौताडा येथील घरी जाण्यासाठी निघाले. सदर सर्वजण बीड रोडवरील साकत फटा येथे आले आसता यातील आरोपींनी यांनी त्यांच्या कडील पन्नास हजार रुपये व एक तोळ्याची आंगठी व मोबाइल असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. यानंतर पुढे दि २७ नोव्हेंबर २०१९ ते १ जानेवारी २०१९ पर्यंत सौताडा येथील आरोपीच्या घरी डांबुन ठेवले तसेच पुढे दि २ जानेवारी २०१९ रोजी पिकअप गाडीत बसवून भुईंज कारखाना येथे नेहुन डांबुन ठेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. यानंतर दि ५ डिसेंबर २०१९ रोजी फीर्यादीस तब्बल आठ दिवसांनी त्याच्या घरी आणुन सोडले तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या नंतर फीर्यादी भागवत ज्ञानोबा चौधार यांनी जामखेड न्यायालयात धाव घेतली त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वरील चार आरोपींन विरोधात एक वर्षानंतर म्हणजे दि २१ डिसेंबर २०२० रोजी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश जानकर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here