

आ. राम शिंदेनी साखर आयुक्तांकडचा वेळ मतदारसंघातील अतिवृष्टीच्या ठिकाणी घालवला तर बरे होईल – विजयसिंह गोलेकर
जामखेड प्रतिनिधी
बारामती एग्रो कारखान्याला साखर आयुक्तांनी क्लिन चीट दिली आसल्याने आ. राम शिंदे यांचा कालचा साखर आयुक्तांकडील व्यर्थ वेळ वाया गेला आहे. मात्र हाच वेळ मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शिवारात जात त्यांची कैफीयत सरकार दरबारी मांडण्यासाठी वापरली असती तर ते जास्त भावले असते आसो टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी पत्रकारांशी बोलताना लावला.


पुढे बोलताना विजयसिंह गोलेकर म्हणाले की आ.रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मेरीट पाहून संधी दिली जाते चमकोगिरी करणाऱ्यांना नव्हे. चूकीला चूक म्हणणे म्हणजे चमकोगिरी नव्हे. चूक कोणाची हे बारामती एग्रो कारखान्याला क्लीन चीट देत साखर आयुक्तांनीच दाखवून दिले आहे. आ.प्रा.राम शिंदे हे मागील दरवाजातून झालेले का होईना पण एक जबाबदार विधान परिषद सदस्य आहेत. त्यांनी तरी पुर्णतः अभ्यास करुनच आरोप करायला हवे होते म्हणजे अशी तोंडघशी पडण्याची वेळ आली नसती. असल्या भंकस आरोपांनी पवारांचा बालही बाका होणार नाही हे त्यांनी नीट समजून घ्यावे.

जामखेड तालुक्यात एकच साखर कारखाना असून त्याची गाळप क्षमता कमी असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना बाहेरच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर अवलंबून रहावे लागते ही वस्तुस्थिती आहे. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना ना.अजित पवारांच्या अंबालिका कारखान्याचा मोठा आधार असून जामखेड मधील शेतकऱ्यांना मात्र बारामती एग्रो सारख्या चांगली सेवा देणाऱ्या कारखान्याची गरज आहे.

त्यातच या भागातील शेतकऱ्यांना वाढीव मदत करण्यासाठी आ.रोहित पवार यांनी या कारखान्याची गाळप क्षमताही वाढवली आहे. त्यामुळे जामखेडकर शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या कारखान्याला त्रास देण्याची चूक करण्याऐवजी ती शक्ती शेतकऱ्यांना इतर पर्यायातून मदतीचा हात देण्यासाठी खर्च करावी अशी माफक अपेक्षा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे व त्यासाठीच आजचे निषेध आंदोलन छेडण्यात आले.

आजच्या आमच्या आंदोलना विरुध्द प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया देणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा अज्ञानीपणा दिसून आला. त्यांनी गाळपाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या ऊसाला कमी भाव मिळत असल्याचे म्हटले आहे. वास्तविक पाहता, एखाद्या कारखान्याने ऊसाचा भाव ठरवल्यास त्याचा फायदा शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच सारख्या प्रमाणात भेटतो आणि पवारांचे कारखाने चांगले भाव देण्यासाठी माहीर आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांचा ओढा तिकडे असतो. परंतू साधा गुळ तयार करण्याचे गुराळही न चालवणाऱ्यांना ते कसे कळणार?
राहीला विषय विकासकामांचा तर आ.रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांमुळेच ते अबालवृद्धात लोकप्रिय झाले आहेत याला कोणीही नाकारु शकत नाहीत. सत्तेचा गैरवापर करुन आ.रोहित पवारांच्या मंजूर विकासकामांना स्थगिती देण्याऐवजी त्या तोडीचा निधी आणण्यासाठी आपली शक्ती पणाला लावावी हीच मागणी सर्वसामान्य नागरीक करत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघाला एक नवी ओळख व प्रतिष्ठा देण्याचे काम आ. रोहित पवार यांनी केले असून त्याचा प्रत्यय मतदारसंघाच्या बाहेर पडल्यास येतो हे कोणीच नाकारु शकत नाही.

आ.राम शिंदे हे मंत्री असताना भीषण दुष्काळात आ.रोहित पवार यांनी मतदारसंघातील जनतेलाच नव्हे तर महाराष्ट्रातील आवश्यक ठिकाणी टॅंकरची सुविधा देत पाणी पाजले. कोरोना काळातही मतदारसंघातील जनतेच्या उपचाराची जबाबदारी घेतली व राज्यभरही वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जनावरातील लंपी आजारावरील लसीकरण शासनाच्या मदतीसह स्वखर्चानेही केले त्यामुळे त्यांची संकटमोचक अशी प्रतिमा तयार झाली आहे. त्यांचा थोडातरी आदर्श घेऊन काम व्हावे अशी माफक अपेक्षा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने व्यक्त करणे हे चूक असेल तर अश्या चूका आम्ही वारंवार करणार असल्याचेही गोलेकर म्हणाले.







