

चंद्रा’ गाणं गाऊन वायरल झालेल्या नेवासाचा जयेश खरे शाळकरी मुलावर संगीतकार अजय अतुल फिदा; ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमात दिली गाण्याची संधी
अहमदनगर प्रतिनिधी दि, २६ सप्टेंबर
काही दिवसांपूर्वी ‘चंद्रमुखी’ सिनेमातील ‘चंद्रा’ गाणं गाणार्या नेवासा येथील जयेश खरे या शाळकरी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडीयात तुफान वायरल झाला. या गाण्याचे संगीतकार अजय अतुल यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोहचला. आणि रातोरात जयेशला पार्श्वगायनाची संधी मिळाली आहे. अजय अतुल यांच्या आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमात त्याला संधी मिळाली आहे. हा सिनेमा शाहीर साबळेंचा बायोपिक आहे.


नेवासा तालुक्यातील करजगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या जयेश खरे चा वर्गात गायलेला चंद्रमुखी या चित्रपटातील चंद्रा हे गाणं गायलं होतं. कोणत्याही वाद्याच्या साथसंगती शिवाय गायलेल गाण्याचा व्हिडिओ शिक्षक कृष्णा राठोड यांनी काढुन शोसल मिडीयावर टाकला होता. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या देखील पसंतीस पडला होता. त्यामुळे जयेशच सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हायरल व्हिडीओनं चर्चेत आलेल्या अहमदनगरच्या जयेश खरेशी. ‘चंद्रा’ फेम जयेश खरे लोकांच्याच नाही तर दस्तुरखुद्द अजय-अतुलच्या मनालाही भिडला आणि त्याला ते थेट घेऊन आले रेकॉर्डिंग स्टुडिओत. आता तो गाणार आहे ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील गाणं.

केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची मुख्य भूमिका साकारत आहे. त्यानं स्वतःही ही भूमिका साकारण्यााठी बरीच मेहनत घेतली आहे. आता महाराष्ट्र शाहीर सिनेमा रिलीज आधीच चर्चेत आला, तो जयेश खरे या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील काजरगावच्या शाळकरी मुलाचं नाव सिनेमाशी जोडल्यानं. जयेश खरे या नेवासा तालुक्यातील शाळकरी मुलाच्या व्हिडीओनं अख्खा महाराष्ट्र भरुन पावला होता, याचं कारण म्हणजे अंगावर काटा आणणारा जयेशचा आवाज.

त्याच जयेशला सोबत घेऊन आता अजय-अतुल ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील गाणं रेकॉर्ड करत आहेत. अंकुशनं आपल्या इन्स्टावर जयेशचा रेकॉर्डिंग स्टुडिओतला तो व्हिडीओ शेअर केला आहे. एवढ्या लहान वयात मौलिक संधी मिळणं खूप कमी जणांच्या भाग्यात असतं. पण जयेशनं आपल्या टॅलेंटनं ते घडवून आणलं. अर्थात म्हणतात नं इतिहास असेच घडतात ते काही खोटे नाही.






