Home ताज्या बातम्या ज्योत आणण्यासाठी गेलेल्या आष्टीच्या दोन भाविकांचा अपघात मृत्यू

ज्योत आणण्यासाठी गेलेल्या आष्टीच्या दोन भाविकांचा अपघात मृत्यू

ज्योत आणण्यासाठी गेलेल्या आष्टीच्या दोन भाविकांचा अपघात मृत्यू ;एक होते उपसरपंच तर दुसरे होते आरोग्य सेवक

कडा प्रतिनिधी 

तुळजाभवानीची पायी ज्योत आणण्यासाठी गेलेल्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील दोघांचा येरमाळ्या जवळील हायवेरोडवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक उपसरपंच तर दुसरे आरोग्य सेवक होते. दोघांच्या जाण्याने सांगवी पाटण गावात शोककळा पसरली आहे.

 

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावातील ५० तरुण भाविक तुळजापूर येथे शनिवारी सकाळी पायी ज्योत आणण्यासाठी गेले होते. यातील एका दुचाकीला शनिवारी रात्री येरमाळा जवळील हायवेरोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील उपसरपंच अमोल सुरेशराव खिलारे (वय ३८) व आरोग्य सेवक महेश भास्करराव भोसले वय (३१) दोघे रा. सांगवी पाटण ता. आष्टी या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील तरूण दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सवात देवीची स्थापना करतात. यासाठी तुळजापूर येथून तुळजाभवानी मातेची ज्योत आणण्याची प्रथा आहे. सोमवारी घटस्थापना असल्याने गावातील ५० तरूण भाविक शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकी, टेम्पो, पिकअप अशा वाहनातून ज्योत आणण्यासाठी तुळजापूरकडे रवाना झाले. या भाविकांमधील महेश भोसले ( ३१ ), अमोल खिलारे (३८ ) हे दोघेजण दुचाकीवर निघाले होते.

दरम्यान, शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास येरमाळाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भोसले आणि खिलारे दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भोसले हा आरोग्यसेवक तर अमोल खिलारे उपसरपंच होते. दोन तरुणांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!