

डॉ. शिंदे यांचे अनाथ व निराधारांचे शैक्षणिक पालकत्वाचे कार्य कौतुकास्पद-आ. रोहित पवार
जामखेड प्रतिनिधी दि २४ सप्टेंबर
हाॅस्पिटलच्या माध्यमातून जनसेवा करीत असताना डॉ सागर शिंदे यांचे सामाजिक दायित्व विषयी भान ठेवून सुरू केलेलं निराधार अनाथांचे स्विकारलेले शैक्षणिक पालकत्वाचे सामाजिक कार्य नक्कीच अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी नागेश विदयालय येथे झालेल्या कार्यक्रमात केले.


समाजातील रंजल्या गांजलेल्या लोकांचे अश्रू पुसून त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न डॉ सागर शिंदे व डॉ मयुरी शिंदे हे डॉक्टर दांपत्य करत असून ते अनेक वर्षांपासून हेल्थ दाताचेे हाॅस्पिटलच्या माध्यमातून जनसेवा करीत आहेत परंतू सामाजिक दायित्व विषयी भान ठेवून त्यांनी सुरू केलेलं निराधार अनाथांचे स्विकारले शैक्षणिक पालकत्वाचे सामाजिक कार्य नक्कीच अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी नागेश विदयालय येथे झालेल्या कार्यक्रमात केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी,पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 135 वी जयंतीचे औचित्य साधून श्री नागेश विद्यालय जामखेड येथे अनाथ गरीब अकरा विद्यार्थ्यांचेे शहरातील हेेल्थ दाताचेे हाॅस्पिटलचे संचालक डॉ सागर कुंडलिकराव शिंदे व डॉ मयुरी शिंदे यांनी शैक्षणिक पालकत्व स्विकारले असुन या विद्यार्थ्यांच्या दोन्ही सत्रांचे वार्षिक फीज.दहावीच्या मुलांची एस.एस.सी परीक्षा फी.शालेय गणवेश, शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, कंपास पेटी, पेन,चित्रकलेचे साहित्य. त्याचप्रमाणे उत्तम क्वालिटीची दप्तर या साहित्यांचे वाटप आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले आपण समाजाला देणे लागतो याचे भान ठेवून या दोन्हीं उभयतांनी आतापर्यंत ८४ अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले आहे.

Post Views: 13





