न्यु महाराष्ट्र बेकर्स चे महाराष्ट्रभर जाळे पसरावे – आ. रोहित पवार

जामखेड प्रतिनिधी

गेल्या ३५ वर्षापासून बेकरी व्यवसायामध्ये सेवा देत आसलेल्या गंभीर कुटुंबीयांनी व्यावसाया बरोबरच अध्यात्मिक नाळ देखील जोडली आहे. या न्यु महाराष्ट्र बेकर्स चे नावाप्रमाणेच महाराष्ट्रात देखील जाळे पसरावे आसे मत आ. रोहित पवार यांनी भेटी दरम्यान व्यक्त केले.

जामखेड शहरातील बीड कॉर्नर जवळील नव्याने सुरू झालेल्या न्यु महाराष्ट्र बेकर्स या शाखा नं तीन च्या दालनास नुकतीच कर्जत जामखेड आ. रोहित पवार यांनी भेट दिली. पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की व्यवसाय कसा करावा, आणि ग्राहकांना सेवा कशी द्यावी याचे उत्तम उदाहरण म्हणून, गंभीर बंधू आणि कुटूंबियांकडे पाहीले जाते. स्वर्गीय बिल्लुशेठ गंभीर यांची तिसरी पिढी आज जामखेड करांच्या सेवेत, न्यु महाराष्ट्र बेकर्स च्या नावाने सेवा देत आहे, एक चांगले व्यावसायिक म्हणून गंभीर कुटुंबीय पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेतच पण या व्यवसाया बरोबर सामाजिक नाळ जपत, सतसंन्ग द्वारे आध्यात्मिक काम देखील ते करत आहेत. या बेकरी मुळे ग्राहकांना आता या दालनात नवनविन सुविधा मिळणार आहेत आसे म्हणत आ. रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी गंभीर परीवारासह जामखेड शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक, अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here