जामखेड तालुक्यात ९० टक्के गायवर्गाचे लसीकरण पुर्ण; मनसेच्या वतीने पशुधन विकास अधिकारी यांचा करण्यात आला सन्मान

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात वाढत्या लंपी स्कीन आजाराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने जामखेड तालुका पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती जामखेड, आ. रोहित पवार यांच्या सहकार्याने बारमाती अॉग्रो पशुअहार कंपनी कडून अत्तापर्यंन्त ५८ हजार गायवर्गीय पैकी ५४ हजार गायवर्गाचे म्हणजे ९० टक्के लसीकरण पुर्ण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संजय राठोड यांचा सन्मान करण्यात आला.


या वेळी सरपंच हवा सरनोबत, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, सनी सदाफुले, गणेश पवार, सोमनाथ कदम, दादासाहेब कदम, संभाजी पवार, गणेश गव्हाणे, राहुल जगताप, प्रदिप अडाले, पीनु साळुंके, सागर राऊत, गोकुळ क्षिरसागर, प्रकाश जगताप उपस्थित होते.


जामखेड तालुक्यातील एकुण नऊ गावांमध्ये एकुण १३ जनावरे लंपी स्कीन आजाराचे आढळून आले होते. या मध्ये १३ पैकी नऊ जनावरे लंपी स्कीन आजारातुन पुर्ण बरे झाले आहेत. तर ४ जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. जामखेड तालुक्यात गायवर्गाची एकुण संख्या लक्षात घेतली तर एकुण ५८ हजार इतकी आहे. शासना कडुन अत्तापर्यंन्त ११ हजार जनावरांचे लसीकरण पुर्ण झाले होते. तर आ. रोहित पवार यांच्या सहकार्याने बारामती अॉग्रो पशुअहार यांच्या कडुन ४३ हजार जनावरांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. जामखेड येथिल पंचायत समितीच्या सर्व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील शेवटच्या वर्षीचे विद्यार्थी व बारामती अॉग्रो पशुअहार यांच्या कडुन जामखेड तालुक्यात सहा दिवस जोरदार लसीकरण मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत जामखेड तालुक्यात ५४ हजार जनावरांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. म्हणजे तालुक्यात ९० टक्के लसीकरण पुर्ण झाले आहे. यासाठी प्रत्येक गावात टीम तयार केल्या होत्या. याकामी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभत आहे.

जनावरांना लागन झाल्या बरोबरच पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळवने व लागन झालेल्या जनावरांचे विलीगिकरण करावे बाधित जणावरांचे दुध आहे ते पिण्यासाठी कसलाही धोका नाही. हा आजार ताबडतोब उपचार घेतल्या नंतर पुर्ण पणे बरा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. तसेच ज्या जनावरांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून आपल्या जनावरांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ संजय राठोड यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यात ५८ हजारांपैकी ५४ हजार जनावरांचे लसीकरण पुर्ण झाले आसल्याने आज दि १७ रोजी सकाळी जामखेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती चे डॉ संजय राठोड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनसे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.





