मतदानकार्ड आधार लिंकला शंभर टक्के पुर्ण करण्यार्‍या बीएलओंचा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कडुन सन्मान.

जामखेड प्रतिनिधी

मतदानकार्ड आधार लिंकिंगचे १००% काम पुर्ण करण्यार्‍या कर्जत व जामखेड मतदारसंघातील बीएलओ यांचा सन्मान मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कडुन सन्मान करण्यात आला.

मतदानकार्ड सोबत आधारलिंक तात्काळ करुन घेणेबाबत कर्जत आणि जामखेड तालुक्यातील नागरीकांना आवाहन केले होते. आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री श्रीकांत देशपांडे हे जामखेड तालुक्यातील मोहा येथील निवारा बालगृह येथे आयोजित भटक्या विमुक्त जमातीच्या राज्यस्तरीय महिला परिषदेला उपस्थित होते.

सदर ठिकाणी त्यांनी परिषदेला निवडणूक विषयक बाबिसंदर्भात मार्गदर्शन केले. लोकशाहीचा पाया बळकट करनेसाठी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घावा असे आवाहन या प्रसंगी केले. तसेच भटक्या विमुक्त समाजासाठी गावोगावी कॅम्प घेऊन त्यांची मतदार नोंदणी सुलभ करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या. याप्रसंगी समाजकल्याण आयुक्त श्री नारणवरे यांनी परिषदेस विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले.

सदर दौऱ्यादरम्यान कर्जत जामखेड मतदार संघाच्या निवडणूक कामकाजाची माहिती घेतली. या वेळी कर्जत जामखेड तालुक्यातील कामकाजाबाबत उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले , तहसिलदार योगेश चंद्रे, तहसीलदार नानासाहेब आगळे, निवडणुक नायब तहसिलदार मनोज भोसेकर यांचे अभिनंदन केले.

तसेच तालुक्यातील मतदान कार्ड सोबत आधार लिंकींगचे १०० टक्के कामकाज करणारे बीएलओंचे प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. यामधे जामखेड तालुक्यातील रोडे बाळासाहेब दत्तात्रय, बोराडे निलेश रमेश, हजारे विकास बाळकृष्ण, घोडके संदीप गेना, बाबाजी राघू दातीर, पवार अविनाश जालिंदर, होडशील प्रभाकर श्रीमंत, गाढवे रामचंद्र आजीनाथ, कुलकर्णी अनिल भानुदास, कात्रजकर गणेश चंद्रकांत सन्मान केला.

याच बरोबर कर्जत तालुक्यातील झावरे सचिन सीताराम, टकले सुनील मुरलीधर, उंडे संतोष मच्छिन्द्र, भवर भारत आनंदा, झगडे अनिलकुमार आबासाहेब, उढाने अमोल दिनकर, सटाले, जेवे दिनकर लक्ष्मण, खोत रामचंद्र दादासाहेब, बिरादार अमित मेहता, टकले रंगनाथ देविदास यांनी १०० टक्के काम केले त्याबाबत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांचा सन्मान करण्यात आला

हे फोटो मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रकाशित करुन राज्यातील सर्व बीएलओंचाच एकप्रकारे सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी मतदानकार्ड सोबत आधारलिंक तात्काळ करुन घेणेबाबत नागरीकांना आवाहन केले. निवडणुकविषयक मतदारयादीचे कामाचा बीएलओ हा कणा आहे. असे उद्गार काढले तसेच कर्जत जामखेड तालुका सप्टेंबर अखेरपर्यंत आधारलिंकिगचे कामकाज पुर्ण करेल अशी खात्री व्यक्त केली. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे उपजिल्हानिवडणुक अधिकारी श्री जितेंद्र पाटील, तहसीलदार श्री शितोळे, नायब तहसिलदार श्री गोसावी ,नायब तहसिलदार श्री रोडे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here