सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे काम उल्लेखनीय-आ. रोहित पवार

जामखेड प्रतिनिधी : १६ सप्टेंबर

गेली अनेक वर्षांपासून विविध प्रकारे मदत करून हजारों लोकांचे प्राण वाचवणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी माझ्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला. त्यांचे कार्य खूप उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. असे मत कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांनी मांडले.

जामखेड येथे जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन व समर्थ हॉस्पिटल व रामभाई शहा रक्तपेढी बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील महावीर भवनत दि १५ सप्टेंबर रोजीभव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. जैन कॉन्फरन्सचे जीवन प्रकाश योजना दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमणलाल लुंकड यांच्या अध्यक्षतेखाली व आ. रोहित पवार यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन झाले. यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, ॲड. हर्षल डोके, जैन संदेशचे संपादक सुभाषबाबू लुंकड, सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, चार्टट अकौंटंट रवींद्र गादिया , डॉ. भरत दारकुंडे उपस्थित होते. या शिबिरामध्ये ७१ जणांनी रक्तदान केले तर एका महिलेने देहदानचा फॉर्म भरला.

या वेळी आ. रोहित पवार यांचा केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना आ. पवार म्हणाले की, संजय कोठारी यांनी मागील माझ्या वाढदिवसा निमित्तही रक्तदान शिबिर घेतले होते. मी गेली तीन वर्षापासून पाहत आहे, कोठारी यांचे कार्य खूप उल्लेखनीय आहे. ते अपघातातील लोकांना मदत करण्याचे काम अविरत ते करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. कोरोना काळातही त्यांनी अनेकांना वैद्यकीय व विविध प्रकारची मदत केली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भामाशहा रमणलाल लुंकड, सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनीही संजय कोठारी यांच्या कार्याचा गौरव केला. परमपूज्य चंदनबालाजी म.सा. आणि परमपूज्य पद्मावतीजी म.सा. यांच्या अज्ञानुपुर्ती परमपूज्य
चारूप्रज्ञाजी म. सा. आणि परमपूज्य वितरागवंदनाजी म.सा. आदि ठाणा ६ च्या उपस्थितीमध्ये झाला.
कोरोनामध्ये लोकांना रक्ताचे महत्व कळले आहे. रक्ताचा तुटवडा होत आहे. त्यामुळे रक्तदान सारखे शिबिर घेणे गरजेचे आहे. रक्तदान केल्याने अपघातातील लोकांचे प्राण वाचण्यास मदत होईल असे संजय कोठारी यांनी सांगितले.

या शिबीरास प्रफुल्ल सोळंकी, डॉ. भारत दारकुंडे, बबन (काका) काशीद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, माजी नगरसेवक मोहन पवार, दिपक भोरे, सचिन गाडे, राजेश गांधी, दीपक लुणावत, माजी सभापती सुर्यकांत मोरे, माजी सरपंच सुनील कोठारी, विजय कोठारी, अमृतलाल कोठारी, उमरभाई कुरेशी, प्रकाश काळे, अमोल लोहकरे, दत्ता साळुंखे, शरद शिंदे, संजय बोरा, सुमित चानोदिया,दिपक पाटील, ईस्माइल सय्यद, प्रवीण उगले, विकीभाऊ सदाफुले, अभय शिंगवी, मनोज भोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे, प्रास्ताविक प्रफुल सोळंकी तर आभार रोहन कोठारी यांनी मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here