आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली व समर्थ हॉस्पिटल आणि श्रीमान रामभाई शहा बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी (दि.१५) सकाळी नऊ वाजता जैन कॉन्फरन्सचे जीवन प्रकाश योजना दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमणलाल लुंकड यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार रोहित पवार यांच्या शुभ हस्ते होणार आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी ,तहसीलदार योगेश चंद्रे, वैद्यकिय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे , पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड , मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, ॲड. हर्षल डोके,जैन संदेशचे संपादक सुभाषबाबू लुंकड , निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, चार्टट अकौंटंट रवींद्र गादिया , डॉ. भरत दारकुंडे उपस्थित राहणार आहेत.
कोरोनामध्ये लोकांना रक्ताचे महत्व कळले आहे. रक्ताचा तुटवडा होत आहे. त्यामुळे रक्तदान सारखे शिबिर घेणे गरजेचे आहे. रक्तदान केल्याने अपघातातील लोकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याचे संजय कोठारी यांनी सांगितले.
कोठारी प्रतिष्ठान मार्फत २६ वेळा रक्तदान शिबिर घेण्यात आलेले आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांनी आजपर्यंत अपघातातील अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत . सध्या कोरोना मुळे रक्ताची कमतरता भासत आहे. प्रत्येकाने रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन कोठारी यांनी केले आहे.
ज्या कोणाला रक्तदान करायचे असतील त्यांनी खालील दिलेल्या नंबर वर नाव नोंदणी या कार्यक्रमाचे संयोजक संजय कोठारी ( ९४२०८००९८१ ) व प्रफुल्ल सोळंकी ( ८०८७७०००७० )
पिंटू बोथरा, दिपक भोरे (९५५२७९५००५)
अमोल लोहकरे (९७६४०३१००८)
यांच्याकडे करावी.
शहरातील महावीर भवनमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, १५ सप्टेंबर २०२२ रोजी रक्तदानाची वेळ ९ ते ५ राहील.