एस एस कोचिंग क्लासेस तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी
गांधी एस एस कोचिंग क्लासेस तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या मध्ये
राजवीर विकी घायतडक हा मोस्ट अँक्टिव स्टूडेंट ऑफ द यर 2022 चा मानकरी ठरला तर बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत आयुष बोधले यांने प्रथम क्रमांक मिळवला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान डिप्लोमा कॉलेज जामखेड चे प्राचार्य विकी घायतडक होते , पत्रकार अविनाश बोधले, क्लासेसचे संचालक सागर गांधी व सौ नीतू गांधी तसेच जामखेड महाविद्यालयाचे प्रा म्हस्के सर, प्रा नितीन राऊत सर, अजित मुरूमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बुद्धिबळ स्पर्धेत समर्थ राऊत हा विजेता ठरला. द्वितीय महेश कुमटकर, तृतीय ओमकार हराळे, उत्तेजनार्थ सोहम आजबे, 8 वर्षे वयोगटातील प्रथम प्रणव लोंढे, द्वितीय शिवराज वारे व गार्गी बिरंगळ, 11 वर्षे वयोगटातील प्रथम रिया सुपेकर, व्दितीय सोहम बन यांनी ट्रॉफी जिंकली. कॅरम स्पर्धेत प्रथम अमान शेख व आदित्य चिंतामणी, व्दितीय अमेय घायतडक व वैभव नागरगोजे यांना गौरविण्यात आले. बुद्धिमत्ता चाचणी स्पर्धेत प्रथम आयुष बोधले, व्दितीय प्रणिती बांगर व तृतीय अनुष्का तंटक यांनी बक्षिसे जिंकली.
रांगोळी स्पर्धेत तनिष्का काळे, वैष्णवी रासकर , निकिता सांगळे विजेत्या ठरल्या. फन गेम्स या प्रकारात आस्था काशीद व स्वराज चकोर हे विजेते ठरले. सुडोकू स्पर्धा मानसी चकोर, तसेच निबंध स्पर्धा शुभम पालवे मोदक डेकोरेशन निकिता सांगळे हे विजेते ठरले. रंगभरण स्पर्धेत राजविर घायतडक, माण्या कुलथे, ध्रुव तंटक आदी विजेते ठरले.