आ.राम शिंदे व नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या उपस्थितीत केले गणेश मंडळांचे स्वागत
जामखेड प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे जामखेड शहरातील मेन रोड भागातील मुख्य मिरवणूक मार्गाने जाणार्‍या शहरातील सर्व गणेश मंडळांचे स्वागत आ. प्रा राम शिंदे व नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या वेळी बोलताना आ. राम शिंदे म्हणाले की नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या माध्यमातून ते नाविन्य पध्दतीने जामखेड शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात हे त्यांनी आयोजित केलेले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम कौतुकास्पद आसतात यावेळी त्यांनी गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान मंडळातील अध्यक्षांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहीत केले.
शहरातील विसर्जन मिरवणूकी दरम्यान गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी जामखेडचे नगरसेवक हे सालाबाद प्रमाणे स्वागत कक्ष उभारतात. या वर्षी देखील स्वागत कक्ष उभारला होता. यावेळी आ. प्रा .राम शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली होती.

नगरसेवक अमित चिंतामणी व आ. प्रा राम शिंदे यांनी शनीचौक या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात स्वागत करण्यासाठी थांबले होते. शहरातील गणेश मंडळांनी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढली होती. त्यामुळे गणेश मुर्ती विसर्जन मिरवणूकी दरम्यान विसर्जन करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या शहरातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी शहरातील आनेक मान्यवर उपस्थित होते.
आ. प्रा राम शिंदे हे स्वतःहा मिरवणूकीत सहभागी होऊन गाण्यांवर थोडा वेळ थिरकले. त्यामुळे गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. अखेर शेवटी शहरातील सर्व गणेश मंडळातर्फे काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणूका शांततेत पार पडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here