जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील गोरगरीब शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे सहकार महर्षी जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ(तात्या) राळेभात पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने जामखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सहकार महर्षी जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ तात्या राळेभात हे काही दिवसांपासुन आजारी होते त्यामुळे त्यांना पुणे या ठीकाणी खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

ते जिल्हा बँकेचे गेल्या पंधरा वर्षे संचालक होते. जामखेड तालुक्यातील सोसायटीच्यांवर त्यांचे मोठे वर्चस्व होते. जगन्नाथ तात्यांना मिस्तरी या नावाने देखील ओळखले जात होते. जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांचे ते वडील होते. तालुका विकास अधिकारी सरोदे साहेब यांचे ते सासरे होते.

गोरगरीब शेतकर्‍यांच्या मुलींच्या लग्नासाठी बँक कर्जाच्या माध्यमातून मदत करुन कन्यादान करणारं सहकार महर्षी नेतृत्व हारपल्याने तालुक्यातील शेतकरी पोरका झाला आहे. सहकार क्षेत्रातील ही पोकळी कधी भरुन न निघणारी आहे. सहकार महर्षी जगन्नाथ (तात्या) राळेभात यांचे निधनाने संपूर्ण जामखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here