आष्टी। प्रतिनिधी


आष्टी शहरातील रहिवासी असलेले मेंबर क्राइम रिपोर्टर्स असोसिएशन दिल्ली येथील पत्रकार अनूप चावला यांनी अहमदनगर येथील सलवेशन आर्मी बाइबल ट्रेनिंग कॉलेज फॉर ऑफिसर ट्रेनिंग फरियाबाग येथील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी सेमी कमर्शल वाटर प्यूरीफायर भेट स्वतःता स्वखर्चाने शनिवारी देण्यात आली.

चावला परिवाराच्या वतीने सलवेशन आर्मी बाइबल ट्रेनिंग कॉलेज फॉर ऑफिसर ट्रेनिंग फरियाबाग अहमदनगर विद्यार्थियांना व कर्मचाऱ्यांसाठी शुद्ध पाणी पिण्यासाठी सेमी कमर्शल वाटर प्यूरीफायर भेट केले आणि पुढील काळात विद्यार्थ्यांना सोलर वाटर हीटर व कॉलेज परिसरात अनेक झाड़े लावण्याचे संकल्प यावेळी बोलताना अनुप चावला यांनी घेतला आहे.

या संकल्पाबद्दल अणि वाटर प्यूरीफायर बद्दल, ट्रेनिंग कॉलेज प्रिंसिपल, स्टाफ अणि विद्यार्थी यांनी चावला परिवारचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमात मेंबर क्राइम रिपोर्टर्स एसोसिएशन दिल्ली अनुप चावला, प्राचार्य अशोक दुषिंग, संजीवनी दुषिंग, प्रकाश साल्वे, छाया साल्वे, सिस्टर रसिका लायल, सिस्टर सुचिता वाघमारे व सर्व विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here