कर्जत प्रतिनिधी

नगर सोलापूर महामार्गावर थेरगाव गावाच्या शिवारामध्ये पुलाचे काम सुरू आहे , त्या परिसरात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कार आणि माल ट्रक यांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये शरद शोभाचंद पिसाळ वय ,२७ वर्ष, निळकंठ रावसाहेब माने वय ३२ वर्ष व धर्मराज लिंबाजी सकट वय २५ वर्ष सर्व राहणार थेरगाव तालुका कर्जत या तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर विक्रम सकट वय २७ वर्ष हा जखमी असून नगर येथे रुग्णालयात नेण्यात आले आहे.

नगर सोलापूर महामार्गावर सध्या काम सुरू आहे. आणि या रस्त्यावर हा तिसरा भीषण अपघात झाला आहे. याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील चार युवक हे आज दि ५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मिरजगाव कडे त्यांची कार क्रमांक एम एच ०४ डि एन ३३४१ मधून जात असताना थेरगाव शिवारात पुलाजवळ रस्त्याचा परिस्थितीचा विचार न करून हायग य अविचाराने भरधाव वेगाने सोलापूर होऊन नगरच्या दिशेने जात असलेला माल ट्रक क्रमांक टी एन २८एएम ३३४२ हा चालवून जोरदार कारला धडक दिली, या मुळे कार ही रस्ता दुभाजकावर जोरदार आदळली . हा अपघात इतका भयानक होता की कार चे गाडीचे इंजिन आणि आत बसलेले युवक बाहेर फेकले गेले.

या अपघातात निलकंठ माने, शरद पिसाळ दोघे ही राहणार थेरगाव तालुका कर्जत हे जागीच ठार झाले आणि धर्मराज लिंबाजी सकट व ज्ञानेश्वर विक्रम सकट हे जखमी झाले होते त्यांना नगर येथे उपचारासाठी घेवून जात असताना धर्मराज सकट यांचे रस्त्यात निधन झाले. याप्रकरणी हरिभाऊ संभाजी सकट यांच्या फिर्यादीवरून ट्रक ड्रायव्हर विजयकुमार कोरियन राहणार नवलपट्टी तामिळनाडू याच्यावर मिरजगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे तात्काळ घटनास्थळी पोलिस पथक घेवून दाखल झाले. तसेच थेरगावचे सरपंच रविंद्र महारणवर, मांदळीचे उपसरपंच धनेश गांगर्डे, नागमठाण चे सरपंच देविदास महारणवर, शोभचंद शिंदे, उपसरपंच रामा शिंदे, सुधीर बचाटे, स्वप्नील शहाणे, परशुराम बावडकर, पोलीस पाटील ईश्वर जोगदंड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांनी जखमींना तात्काळ मदत करून रुग्णालयात हलविन्यास मदत केली. मृतांना कर्जत येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे.

अपघातामुळे वाहतुकीची कोंडी
या अपघाता नंतर नगर सोलापूर महामार्गावर अपघात झालेल्या परिसरात व्हातुकीची कोंडी झाली होती. ती पोलीस विभागाने दूर केली.
अपघातानंतर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते अशी माहिती सह्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here