जामखेड प्रतिनिधी

शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा २०२२ आदर्श शिक्षक पुरस्कार लटकेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षका अनिता विठ्ठल पवार (पिंपरे) यांना जाहीर करण्यात आला आहे.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे जिल्हा शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाले आहेत. प्रत्येक तालुक्यातून एक असे १४ व २ केंद्रप्रमुख असे एकूण १६ पुरस्कार शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा पुरस्कार दिले जातात. यात प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक निवडला जातो. या मध्ये या वर्षी जामखेड तालुक्यातील लटकेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अनिता पवार (पिंपरे) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिक्षिका अनिता विठ्ठल पवार (पिंपरे) या जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्ती (शिऊर), केंद्र -नायगाव, ता.जामखेड जि. अहमदनगर येथे सन २०१३ पासूनकार्यरत आहेत. २०१३ साली शाळेचा पट ८ होता. यानंतर पवार मॅडम यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शने व सरावाने आज शाळेचा पट ५० झाला आहे. शाळेमध्ये दरवर्षी शंभर टक्के मुले शिष्यवृत्ती परीक्षेला बसवली जातात व सलग ४ वर्ष शाळेचा शिष्यवृत्ती निकाल शंभर टक्के लागला असून ३ मुलांची राज्य गुणवत्ता यादीत तर २४ मुलांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. सलग पाच वर्ष नवोदय साठी सहा मुलांची निवड झाली, एका विद्यार्थ्यांची ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे या ठिकाणी निवड झाली. दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षेला शाळेतली मुले बसवली जातात. आतापर्यंत दरवर्षी शाळेतील अनेक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादी चमकली आहेत.

शाळेमध्ये विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, नवोदय या परीक्षांचे मार्गदर्शन सातत्याने केले जाते. शाळेचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागतो. शालेय परिसरामध्ये वृक्ष संवर्धन केलेले असून शालेय परिसर हिरवागार आहे. तसेच आतापर्यंत १ लाख १८ हजार एवढा लोकसहभाग जमा करून शाळेसाठी पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आली . लोकसहभागातून संगणक, एलईडी, साऊंड सिस्टिम इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच लोकसहभागातून शालेय रंगरंगोटी व वृक्ष संवर्धनासाठी निधी उपलब्ध केला. बंद पडू लागलेली शाळा पुन्हा एकदा नवीन जोमाने सुरू झाली.

या विविध उपक्रमामुळे अनिता विठ्ठल पवार (पिंपरे) यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्ती यांना यावर्षीचा सन २०२२ चा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार मिळाला त्या बद्दल पुणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी काळे साहेब ,बीड माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे , गटविकास अधिकारी प्रकाश पोळ , गटशिक्षणाधिकारी खैरे साहेब, केंद्रप्रमुख वराट सर, मुकुंद सातपुते सर, घोडके सर, कुमटकर सर, कुंभार सर, त्र्यंबके सर, राऊत सर , पारखे सर व जामखेड तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here