जामखेड प्रतिनिधी

लाईटच्या डी. पि. च्या पाठपुराव्यावरुन श्रेय घेण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी दाखल झालेल्या फीर्यादी वरुन दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तालुक्यातील लोणी येथील या घटनेस राजकीय वळण लागले आहे.


या बाबत मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील लोणी येथील फिर्यादी अन्सार पठाण हे जयराम खामकर यांच्या दुकानासमोर असताना आरोपी शहाजी परकड याने तू डी. पी. कशी काय आणली तिचा पाठपुरावा आम्ही केला होता. सरपंच आमचा आहे असे म्हणून घाण घाण शिवीगाळ करून गचांडी धरून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे अन्सार पठाण यांच्या फिर्यादवरून शहाजी परकड यांच्या विरुध्द गुन्हा दाखल आहे.


तसेच तू गावामधील डी.पी.का बसवली तू हे काम करायचे नाही असे म्हणत शिवीगाळ करणाऱ्या अन्सार पठाण यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी फिर्यादी शहाजी परकड यांना तू गावांमधील डी.पी.का बसवली म्हणून शिवीगाळ मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली आहे आरोपी आन्सर पठाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही घटना 2 सप्टेंबर रोजी सकाळी लोणी येथिल जयराम खामकर यांच्या दुकानासमोर घडल्या आहेत.


या दोघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत ही घटना गावातील अंतर्गत राजकारण पाहता डी. पी. बसवण्याचे चे श्रेय घेण्यावरून झाल्याचे सांगितले जात असून यासंदर्भात राजकीय संघर्ष खेड्यापाड्या पर्यंत पोहोचला असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आरोपी विरुद्ध प्रतिबंधक कारवाई पोलिसांनी केली असून दोन्ही आरोपींना वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर केले आहे या परस्पर विरोधी गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे, हेडकॉन्स्टेबल रईस सय्यद हे करीत आहेत.






