आष्टी /कडा, प्रतिनिधी

तालुक्यातील बारामती-पैठण मार्गावरील खाकाळवाडी शिवारात भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या बाप-लेकाचा समोरुन भरधाव आलेल्या कारने दिलेल्या धडकेत दोघांची जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात वडील अरूण बापूराव औटे (वय-५४) आणि मुलगा सुरज अरूण औटे (वय-२४) अशी मृतांची नावे आहेत.

आष्टी तालुक्यातील नांदा येथील अरूण बापूराव औटे व सुरज अरूण औटे हे शेतकरी पितापुत्र दोघेही शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतातील भाजीपाला विक्रीसाठी नांद्यावरुन कड्याकडे दुचाकीवरून घेऊन जात होते. या दरम्यान, कड्याकडून मिरजगावकडे जाणार्‍या (एम.एच.जीयु-९९६७) असा क्रमांक असलेल्या आय-२० अॅक्टिव्ह या समोरुन भरधाव येणा-या कारची आणि दुचाकीची बारामती-पैठण मार्गावरील खाकाळवाडी शिवारात समोरासमोर धडक झाली.

या भीषण अपघातात दुचाकीवरील बाप लेकाचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. अपघाताची माहिती मिळताच कडा पोलिस चौकीच्या कर्मचा-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील दोघे कर्ते पुरुष अपघातात मृत झाल्याने औटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here