जामखेड प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करून सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे व पालकांनी आपल्या मुलांवर अनावश्यक इच्छा लादु नयेत. तसेच सर्वांनी मिळून शाळेच्या विकासामध्ये सहकार्य करावे असे मत जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक १५ विद्यार्थ्यांचा व नूतन पीएसआय मनीषा वाघमारे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटीचे व रा काँ प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी प्रमुख उपस्थिती जामखेड नगर परिषद मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, स्थानिक स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर राष्ट्रवादी जामखेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अशोक यादव, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी, पर्यवेक्षक रघुनाथ मोहोळकर, प्रकाश सोनवणे, नगरसेवक अमित जाधव, विनायक राऊत, प्रकाश काळे ,राजेंद्र गोरे, वैजनाथ पोले, ऋषिकेश कुंजेर शिवाजी ढाळे, माजी उपप्राचार्य प्रकाश तांबे, गोपाळ बाबर ,संतोष पवार, सांगळे ए एम, आंधळे मॅडम, शेकडे मॅडम, शेटे ज्ञानेश्वर, एनसीसी प्रमुख मयूर भोसले, विद्यार्थी, पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते.


NMMS परीक्षा 2021.22 शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी -निकम अभिजित गणेश , भिलारे वेद प्रदीप, पिंपळे सिद्धेश कु़ृंडलीक, पोकळे शिवम राजेंद्र राळेभात, शिवम आनंद वारे, संग्राम सतीश टेकाळे, आदित्य हरिश्चंद्र कोल्हे, सार्थक रमेश खाडे, राहूल संपत जगताप, कृष्णा काकासाहेब पोकळे, अथर्व राजेंद्र मोरे, शिवशंभू शरद पवार, ओंकार महिपती उगलमुगले, सार्थक निलेश जाधव, रोहन माधव व मार्गदर्शक शिक्षक गर्जे एस. व्ही, बोलभट आर. एम. ,शिंदे बी. एस.,लटपटे डी. व्ही. ,ससाणे एस. आर,बाबर जी. ए. विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रजी कोठारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व लागेल ती मदत आमच्या माध्यमातून आम्ही करू असे मनोगत व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आ. रोहित दादा पवार , उत्तर विभागाचे सल्लागार समितीचे अध्यक्ष आ.आशुतोष दादा काळे, उत्तर विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, सहायक विभागीय अधिकारी काकसाहेब वाळुंजकर, शिवाजीराव तापकीर , स्थानिक स्कूल कमिटी, स्थानिक सल्लागार समिती सर्व सदस्य ,शिक्षक -पालक संघ ,माता -पालक संघ , शालेय व्यवस्थापन व विकास समिती. यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे व आभार प्रदर्शन शिंदे बी एस यांनी केले.






