जामखेड प्रतिनिधी (अविनाश बोधले)

(अविनाश बोधले) शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या जागी लवकरच १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आसुन उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे. तो पर्यंत जामखेड ग्रामीण रुग्णालय हे शेजारी आसलेल्या जुन्या कोविड सेंटरसाठी तयार करण्यात आलेल्या ठिकाणी हलविण्यात येणार आसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वाघमारे यांनी दिली. या उपजिल्हा रुग्णालयास आ. रोहित पवार यांनी मंजुर करुन नीधी देखील आणला होता.

पुर्वी आसलेल्या ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा आसलेल्या अभाव तसेच योग्य पद्धतीने सुविधा मिळत नव्हत्या त्यामुळे गरीब कुटुंबातील रुग्णांना खजगी हॉस्पिटल चा आधार घ्यावा लागत होता. तसेच गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात याची आर्थिक झळ बसत होती. या बाबत आ. रोहित पवार यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी तातडीने त्या वेळी महाविकास आघाडीचे सरकार आसताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सहकार्याने १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन आनला होता. चार महीन्यापुर्वी म्हणजे दि २ मे २०२२ रोजी या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन त्या वेळी आसलेले राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व आमदार रोहित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले होते.

चार महीन्यांच्या प्रतीक्षे नंतर आता या जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी लवकरच सुसज्ज असे १०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या जागी आसलेले सध्याचे रुग्णालय बाजुला आसलेल्या व पुर्वी तयार केलेल्या कोविड सेंटरच्या हॉल मध्ये हलवण्यात येणार आहे. याच बरोबर आरोग्य कर्मचार्‍यांच्या निवास स्थानासाठी आ. रोहित पवार यांनी नीधी आनला आसुन बीड रोड याठिकाणी ही वसाहत बांधण्यात येणार आहे.

काही वर्षांत या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पुर्ण होऊन हे उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्या नंतर या ठिकाणी सुसज्ज आयसी यु सुविधा , सीटी स्कॅन सुविधा , एम आर आय सुविधा, सोनोग्राफी सेंटर तसेच कर्मचाऱ्यंसाठी अत्याधुनिक निवास उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here